Lok Sabha Elections 2024: आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकली अवकाळीची मदत; शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली

Rabbi Crop Panchnama Stalled: लोकसभा निवडणूकीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.आचारसंहिता लागल्यामुळे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे रखडले आहेत. बाधित पिकांसाठी निधीची मागणी थांबली आहे.
Farmer Loss
Farmer LossYandex
Published On

अमर घटारे

Lok Sabha Code of Conduct Farmer Loss

काही दिवसांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणूकीच्या (Maharashtra Lok Sabha Elections) तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आचारसंहिता लागल्यामुळे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे रखडले आहेत.बाधित पिकांसाठी निधीची मागणी थांबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाबाधित पिकांच्या निधीसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. (latest marathi news)

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील तीन हजार हेक्‍टरवरील गहू, हरभरा आणि फळ पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं (Rabbi Crop Panchnama Stalled) आहे. परंतु या बाधित क्षेत्रांचे पंचनामे अद्याप सुरू झाले नाहीत.यातच आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही सर्व प्रक्रिया थांबलेली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांची मदत रखडली

आपत्तीमध्ये धारनी आणि चिखलदरा तालुक्यातील 2278 हेक्टरमधील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आला आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू,हरभरा काढणीला आलेला असताना शेतकऱ्यांवर संघट आले होते. हरभऱ्याची सोंगणी करून काही भागात गंजी लावल्या होत्या मात्र अवकाळी पावसाने हरभराचे मोठे नुकसान झाले (Lok Sabha Elections 2024) होते.मात्र, चार जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा प्रशासन शासनाकडे मदतीची मागणी करणार का? शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित (Farmer Loss) होत आहे.

आचारसंहिता आता शेतकऱ्यांसाठी मोठी अडसर ठरत आहे. आता ४ जूनपर्यंत आचारसंहिता आहे. त्यामुळे या कालावधीत पिकांचे पंचनामे होणार नाहीत. शेतकऱ्यांची मदत रखडली आहे. अगोदरच अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला (Maharashtra Lok Sabha 2024) आहे. त्यावर आता आचारसंहितेचं ग्रहण लागल्याचं दिसत आहे.

Farmer Loss
Farmers News: शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आनंदाचा शिधा मिळणार नाही

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आनंदाचा शिधावाटप २ महिने बंद राहणार आहे. आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून ७ जूनपर्यंत लाभार्थींना आनंदाचा शिधावाटप ((Maharashtra Elections) न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्य सरकारकडून होळी, गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार होता.परंतु त्याला आता आचारसंहितेचा अडसर आला (code of couduct) आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे. ऐन सणाच्या तोंडावरच आता आनंदाचा शिधा मिळणार नाहीये.

Farmer Loss
Farmer Protest: शेतकऱ्यांचं वादळ पुन्हा दिल्लीवर धडकणार, मोर्चामुळे प्रशासन अलर्टवर; ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com