Farmer Protest: शेतकऱ्यांचं वादळ पुन्हा दिल्लीवर धडकणार, मोर्चामुळे प्रशासन अलर्टवर; ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा

Farmer Protest Delhi: शेतकरी आज पुन्हा आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Farmer Protest
Farmer ProtestSaaM Tv
Published On

Farmer Protest Latest Update

आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ आज शेतकरी दिल्लीकडे कूच (Farmer Protest) काढणार आहे. केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांनी 10 मार्च रोजी चार तासांचा देशव्यापी रेल रोकोही पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमा आणि रेल्वे आणि मेट्रो स्टेशन आणि बस स्टँडवर सुरक्षा वाढवली आहे.  (latest accident news)

3 मार्च रोजी किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील शेतकऱ्यांना बुधवार (6 मार्च रोजी) दिल्ली गाठण्याचं आवाहन केलं (Farmer Protest Update) होतं. पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वर कायदेशीर हमी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेत कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'दिल्ली चलो' आंदोलन

मंगळवारी, दिल्लीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, शहरात पोहोचणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर पोलीस पथके तैनात करण्यात आली (Farmer Protest Delhi) आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'दिल्लीमध्ये सीआरपीसी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या कलमानुसार एका भागात चार किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. आंदोलक जमलेल्या सर्व शक्य ठिकाणी पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो' आंदोलन (Delhi Chalo March) सुरू केलं होतं. परंतु सुरक्षा दलांनी त्यांना हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर रोखलं. तेव्हापासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी अडकले आहेत. आंदोलक शेतकरी आणि केंद्र यांच्यात त्यांच्या मागण्यांबाबत आतापर्यंत किमान चार बैठका झाल्या आहेत. परंतु काहीही तोडगा निघालेला नाही.

Farmer Protest
Farmers Protest: शेतकऱ्यांनी आखली नवी रणनिती, येत्या ६ मार्चला रेल्वे मार्ग रोखणार; केंद्र सरकारचं टेन्शन वाढणार

शांततेत मोर्चा

शेतकरी नेते तेजवीर सिंह म्हणाले की, 6 मार्च रोजी संपूर्ण भारतातील शेतकरी दिल्लीतील जंतरमंतरकडे शांततेने मोर्चा काढतील. मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमधील शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी दिल्लीतला जाण्याची पूर्ण तयारी केली ( Delhi News) आहे. शेतकऱ्यांच्या घोषणेनुसार पंजाब आणि हरियाणा वगळता इतर राज्यातील शेतकरी 6 मार्चला शांततेत दिल्लीकडे कूच करणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने मान्य केलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने लागू कराव्यात, असे शेतकरी नेते डॉ.दर्शन पाल सिंह यांनी म्हटलं (Farmer Protest News) आहे. यामध्ये कायदेशीर हमी व एमएसपी खरेदी, शेतकरी व मजुरांची कर्जमुक्ती, लखीमपूर खेरी घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा, शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे.

Farmer Protest
Farmers Lal Vadal: सरकारसोबत आंदोलक शेतकऱ्यांची झालेली बैठक निष्फळ; आंदोलन सुरूच राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com