देशभरातील शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा 'चल्लो दिल्ली'चा नारा दिला असून येत्या ६ मार्चला राजधानी दिल्लीत धडकण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने तातडीने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा दिल्लीत आंदोलन केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असंही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इतकंच नाही, तर येत्या १० मार्च रोजी देशभरातील रेल्वे मार्ग रोखणार, असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. मागील काही दिवसांपासून शांत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतल्याने केंद्र सरकारचं देखील टेन्शन वाढलं आहे. (Latest Marathi News)
शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी देशभरातील शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) पोलिसांनी हरियाणाच्या शंभू सीमेवरच रोखून धरलं आहे. आतापर्यंत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये जवळपास ४ बैठका झाल्या आहेत.
मात्र, या बैठकीतून कोणताही तोडगा निघालेला नाही. अशातच शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आता संयम सुटला आहे. येत्या ६ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊन आंदोलन करावे, असं आवाहन शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर आणि जगजितसिंग डल्लेवाल यांनी केलं आहे.
त्याचबरोबर सध्याच्या आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी अधिकच आंदोलन तीव्र करावं. जोपर्यंत सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत माघार घेऊ नका, असं आवाहन देखील शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. त्याचबरोबर १० मार्चला देशभरातील रेल्वे ४ तासांसाठी रोखून धरली जाईल, असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.