Nanded News : साखर गाठीच्या व्यवसायातून कुटुंब कमवतोय लाखो रुपये

Nanded News : होळी म्हटल की रंगाबरोबरच बाजारात एका खाद्यपदार्थाची दुकान थाटलेली असतात. तो पदार्थ म्हणजे खारीक खोबऱ्याच्या आणि साखरेच्या गाठी
Nanded News
Nanded NewsSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : होळी सणाला खारीक खोबर आणि साखरेच्या गाठीला महत्व असतं. नागरिक या गाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. (Nanded) याच व्यवसायातून नांदेडचे एक कुटुंब साखरेच्या गाठीच्या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करत आहे. (Latest Marathi News)

Nanded News
Pandharpur News : विठ्ठल मंदिराला मुळ रूप देण्याचे काम सुरू; वास्तुशिल्पाचे आयुर्मान सातशे वर्षांनी वाढणार

होळी (Holi festival) म्हटल की रंगाबरोबरच बाजारात एका खाद्यपदार्थाची दुकान थाटलेली असतात. तो पदार्थ म्हणजे खारीक खोबऱ्याच्या आणि (Sugar) साखरेच्या गाठी. या साखर गाठी तयार करणारे दत्ता सिद्धनाथ असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. दत्ता सिद्दनाथ हे नांदेड शहरातील चौफाळा भागातील भोई गल्ली येथील रहिवासी आहेत. मागील दहा वर्षापासून ते होळी सणाला लागणाऱ्या साखरेच्या गाठी तयार करत असतात. यातून ते उत्पन्न मिळवत असतात. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nanded News
Electric Shock : ट्रॅक्टरला मेन विद्युत लाईनची तार चिकटली; एका ऊसतोड महिला मजुराचा मृत्यू

दोन महिन्यात २ लाखाचे उत्पन्न  

दत्ता सिध्दनाथ यांना पत्नी भाग्यश्री, मुलगा चेतन आणि पंकज हे देखील मदत करत असतात. दोन महिन्यात ते जवळपास शंभर क्विंटल गाठी तयार करून बाजारात विक्री करत असतात. या व्यवसायातून त्यांना दोन महिन्यात दोन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे दत्ता सिद्दनाथ यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com