Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 18 November 2024: आज सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रातली थंडी, महायुती-महाविकास आघाडीच्या सभा, विधानसभेसाठी प्रचारांचा धुराळा पीएम मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी यांच्या सभा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस यासह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Mumbai News : मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Summary

मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच आहे.

ऑगस्टक्रांती एक्सप्रेस मधून तब्बल ४२ लाखांची रोकड जप्त

उसामा अन्सारी,२४ नावाच्या इसमांकडून करण्यात आली रोकड जप्त

चौकशीत समाधानकारक उत्तरे देता न आल्याने रोकड करण्यात आली जप्त

गोपनीय माहितीच्या आधारावर मुंबई सेंट्रल जीआरपीची कारवाई

निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू

Ram satpute News : आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

आमदार राम सातपुते यांचे नातेपुते पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

उत्तम जानकर समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्यांला मारहाण केल्याचा आरोप.

Maharashtra Election : महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्ती करण्यात आली आहे.

 Uddhav Thackeray :  ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका 

उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

मनसे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसून गुजरात नवनिर्माण सेना आहे. मनसे ही महायुतीची बी टीम आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.

Pandharpur News : कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

नुकत्याच झालेल्या पंढरपूरच्या कार्तिक यात्रेमध्ये विठ्ठल रुक्मणी चरणी तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयाचे दान आले आहे. यामध्ये 21 लाख रुपयांचे ऑनलाईन दान आले आहे. तर विठ्ठलाच्या चरणावर ४१ लाखाचे अन् इतर योजनातून बाकीचे दान आले आहे. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेच्या तुलनेत १ कोटी १९ लाख इतकी घट झाली आहे.

Kalyan News : अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Summary

अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निवडणुकीत माझे काम करणारे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख चैनू जाधव यांना तीन दिवसांकरिता हद्दपारची नोटीस देण्यात आली आहगे. भाजप उमेदवारांसोबत फिरणाऱ्याच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही. कितीही दबाव तंत्र वापरा,चेनू जाधव मतदारसंघातून बाहेर जाणार नाही. आमच्यावर कारवाई केली तरी जनता हिशोब घेणार आहे, असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला.

Pankaja Munde News : पंकजा मुंडे यांच्या बॅगांची तपासणी 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरने आगमन

निवडणूक अधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टर मधील पंकजा मुंडे यांच्या बॅगांची तपासणी

शिवसेना उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे घनसावंगी मध्ये दाखल.

Sangola News : सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

सांगोल्यातील अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांच्यावर विरोधी गटाकडून पाठिंब्यासाठी दबाव टाकला जात आहे अशी तक्रार आहे. अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांनी केली आहे. घरासमोर गोंधळ घातला जात आहे. माझा जिवाला धोका निर्माण झाला आहे, अशी लेखी तक्रार अपक्ष उमेदवार राजाराम काळेबाग यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Solapur News : सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

- सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा

- भटके विमुक्त समाजाची 150 एकर जागा सोडवून देण्याचे काम भाजप करतेय त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय

- जोरदार शक्तीप्रदर्शन करत भटके विमुक्त समाजाने भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला.

- काँग्रेसने आम्हाला 70 वर्षे केवळ आश्वासन दिले मात्र भाजपने आम्हाला आमच्या हक्काची जागा दिली

- या जागेमुळे आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहेत त्यामुळे आम्ही पाठिंबा दिला.

Maharashtra Election : कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

आज प्रचार रॅलीची सांगता असतानाच ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचे कार्यकर्ते अष्टविनायक चौक या ठिकाणी एकमेकांचा समोर आलेय आणि एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Amravati News: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघात आज दिवसभर बच्यू कडू बाईक रॅली करत साधणार नागरिकांशी संवाद..

यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक बच्चू कडू यांच्या सोबत बाईक रॅली मध्ये सहभागी झाले होते..

Mumbai News: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

माझी महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

त्यांच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

राजकारण न करण्याचा देखील उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सल्ला

Baramati News: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

आज बारामती अजित पवार यांची समारोप सभा

Pune News: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

"प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही, चेतन तुपेंने मात्र फुटीरांना साथ दिली"

शरद पवारांची सोशल मीडियावरून टीका

"वडिल विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?’ हे त्यांनी शिकायला हवे होते" शरद पवार यांची चेतन तुपे यांच्यावर सोशल मीडियावरून टीका

प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे हडपसर मतदारसंघाचे उमेदवार

जगताप यांच्या समोर विद्यमान आमदार चेतन तुपे यांचे आव्हान

Pune News: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टर आणि गाड्या देखील तपासल्या

पुण्यातील भोर मतदार संघाच्या सभेला जाताना सुप्रिया सुळे यांच्या गाड्यांची तपासणी

Solapur News: मतदारांना पैसे वाटणाऱ्यांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले

मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील विडी घरकुल परिसरात रात्री उशिरा घडला प्रकार

पैसे वाटप करणारे व्यक्ती हे सोलापूर उत्तरचे भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे बंधू असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मात्र विजयकुमार देशमुख यांच्या बंधुवर कोणतीही कारवाई न करता कार्यकर्त्यावर पोलीस कारवाई करतं असल्याचा ही शरद पवार गटाचा आरोप

Baramati News उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

आज दुपारी 2 वाजता फडणवीस यांची दौंड येथे सभा

महायुती उमेदवार राहुल कुल याच्या प्रचारासाठी सभा

काही फडणवीस बारामती विमानतळावर येतील

Mumbai News:  शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

ठाकरे गटाचे आमदार व उमेदवार अजय चौधरी यांना घेऊन शिवडीचे विधानसभा संघटक सुधीर साळवी बुलेटवर सवार

शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजय चौधरी यांच्या प्रचारासाठी लालबाग येथे बाईक रॅलीच आयोजन

अजय चौधरी यांच्यासोबत सुधीर साळवी रॅलीमध्ये सहभागी

अजय चौधरी यांना बुलेटवर घेऊन सुधीर साळवी सवार

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवडी विधानसभेत बाईक रैली चे आयोजन

Pune News: पुण्यात आचारसंहिता भंगाच्या १,२८५ तक्रारी

पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये आचारसंहिता भंगाच्या एक हजार २८५ तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत

यांपैकी नऊ मतदारसंघांमधील तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे

सर्वाधिक तीन गुन्ह्यांची नोंद मावळ मतदारसंघातून करण्यात आली आहे

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली माहिती

फिरत्या सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून १०० मिनिटांमध्ये या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे

Pune News: पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ११७९ जणांना अटक

पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२६७ गुन्हे दाखल

तर ११७९ जणांना अटक करत ५ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त

अवैधरित्या दारूची विक्री आणि ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर

१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात १८ ठिकाणी चेक नाके उभारत आणि छापेमारी करत कारवाई

Mumbai News: उद्धव ठाकरेंच्या सभेकडे मतदारांनी फिरवली पाठ, भाजपकडून व्हिडीओ पोस्ट

मुंबईतील बीकेसीतल्या सभेकडे मतदारांनी फिरवली पाठ

उद्धव ठाकरेंच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ मुंबई भाजपकडून ट्विट

मुंबईकरांनी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंना नाकारल्याचा टोला

Jalgaon News: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

जळगावात भल्या पहाटे अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

जळगावातील मेहरूण परिसरात आज अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर झाला गोळीबार

Mumbai News: शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज एक टिझर जारी

शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज एक टिझर जारी

महाराष्ट्रीयन की महायुतीये या शब्दात विचारले प्रश्न

महायुतीये या शब्दावरून वाद होण्याची शक्यता

Mumbai News: उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

आज प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

दोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने, तर प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

Pune News:  प्रचार थांबणार, हालचाली वाढणार, पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

प्रचार थांबणार, हालचाली वाढणार, पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

मागील २० दिवस झाडल्या गेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

बारामती होणाऱ्या शरद पवार आणि अजित पवारांच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष

Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

पुण्यातील डोणजे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना

पुणे ग्रामीण पोलिसांनी केली तिघांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com