मुलांमधील शिस्त हे पालकांचे संस्कार दर्शवतात. मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवणे, जबाबदारीने वागणे, काही वेळेस शिस्त पाळणे या सगळ्यांमधून मुलांबरोबर त्यांच्या पालकांची शिस्त सुद्धा कळायला मदत होते. त्यातच पालक जे मुलांसमोर वागतात तेच मुलं करतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पालकांनी मुलांसमोर करणे थांबवले पाहिजे. अन्यथा त्या गोष्टी मुलांच्या डोक्यात राहतात आणि त्याच पद्धतीने मुले वागायला लागतात.
नियमांचे पालन करणे
पालकांनी मुलांसमोर कोणत्या गोष्टी बोलायचे नाही याचा नियम करणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी काही नियम मुलांना देखील समजावून सांगितले पाहिजे. जेव्हा पालक नियमांची सातत्याने अंमलबजावणी करतात, तेव्हा मुले सीमांचा आदर करायला आणि परिणाम समजून घ्यायला शिकतात.
उदाहरण देऊन शिकवा
मुले जे पाहतात त्याचे अनुकरण करतात. जेव्हा पालक त्यांच्या वागण्यामध्ये शिस्त लावतात, जसे की वेळेवर कार्ये पूर्ण करणे, कंटाळा न करणे, वेळेचा योग्य वापर करणे. तेव्हा मुलांना उदाहरण देऊन शिकवा. त्याने त्यांच्या ते पक्के लक्षात राहील.
जबाबदारी पुर्ण करायला शिकवा
खेळण्यांची साफसफाई करणे किंवा कामे करणे यासारखी वयोमानानुसार कामे सोपवणे मुलांना जबाबदारी शिकवते. पालकांना असे दिसून येईल की, जेव्हा ते मुलांवर जबाबदारी देतात तेव्हा त्यांच्यात शिस्त, स्वातंत्र्य आणि कर्तृत्वाची भावना विकसित होते जी खरोखरच स्वाभिमान वाढवते. बरेच पालक मुलांना जबाबदाऱ्या द्यायला नाकारतात. त्याने मुलांना भविष्यात खूप अडचणींचा सामना करावा लागेल.
चांगल्या कामांसाठी बक्षीस देणे
बक्षीस देणे किंवा चांगल्या वर्तनाची प्रशंसा करणे ही एक शिस्त आहे. जेव्हा ते प्रयत्नशील असतात तेव्हा पालक मुलांमध्ये जबाबदारीची वागणूक वाढवतात. त्याने मुलांचा सकारात्मक आत्मविश्वास वाढवतो आणि शिस्त हा एक गुण ते फॉलो करायला सुरुवात करतात. मुलांना त्यांच्या प्रत्येक कामाबद्दल विचारणे, दिवस भरातल्या घटामोडी विचारणे ही सवय सुद्धा खूप कामी येते. त्याने मुलांना त्यांच्या चांगल्या वाईट कामांचा आढावा मिळतो. तसेच वेळेचे नियोजन कसे होते तेही कळायला सुरुवात होते.
Written By: Sakshi Jadhav