जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी महागड्या सौंदर्य उपचारांवर पैसे खर्च करत असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेच्या निगा राखण्याच्या दिनचर्येत काही नैसर्गिक गोष्टींचा नक्कीच समावेश करा. रात्री झोपण्यापूर्वी यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावर लावली, तर काही आठवड्यांतच तुमच्या त्वचेचा रंग बऱ्याच प्रमाणात सुधारू शकतो. चला जाणून घेऊया अशाच काही औषधी गुणधर्मांचे फायदे.
गुलाबपाणी
तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये गुलाब पाण्याचा समावेश करा. गुलाब पाणी तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा जेणेकरून तुमच्या त्वचेवरील सर्व घाण निघून जाईल आणि तुमच्या त्वचेची हरवलेली चमक परत येईल. तसेच गुलाब पाणी खिश्याला परवडणारे आहे. पार्लरमध्ये जास्त पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही हा उपाय घरच्या घरीच करू शकता.
कच्चे दूध
कच्च्या दुधात आढळणारे सर्व घटक तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्चे दूध लावणे सुरू करा. यासाठी कापसाचा बॉल तयार करुन 2 चमचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा. कच्चे दूध तुमच्या त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते.
कोरफड एलोवेरा जेल
आजींच्या काळापासून, त्वचेसाठी कोरफड एलोवेरा जेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर कोरफड एलोवेरा जेल लावल्याने तुमची त्वचा मॉइश्चराइज आणि हायड्रेट राहते. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नियमितपणे त्याचा समावेश करून तुम्ही तुमच्या त्वचेची चमक वाढवू शकता. मात्र, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.
Written By: Sakshi Jadhav