Saam Tv
तुम्ही मशरूम प्रेमी असाल तर तुमच्यासाठी खास रेसिपी आहे. तुम्ही नेहमी करत असलेल्या स्टाईलचे मशरुम आता वेगळ्या आणि झटपट स्टाईलने तयार कराल तेही अगदी १० मिनिटांत. चला पाहूया रेसिपी.
जिरे, धणे, काळी मिरी, बडीशेप, मोहरी, 3 सुक्या लाल मिरच्या, खसखस, 7 लसूण पाकळ्या, आले, चवीनुसार मीठ, गूळ, १/४ कप साधे दही, पाणी.
400 ग्राम बटन मशरूम, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, तूप, 2 वाटी कांदे, 4 कढीपत्ता, 1 टीस्पून लिंबाचा रस
सर्वप्रथम जिरे, धणे, काळी मिरी, बडीशेप, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या भाजून घ्या.
आता आले, लसूण, चिंच, मीठ, खसखस, दही आणि पाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट बनवा.
मग मशरूम धुवून त्याचे काप करा आणि मीठ, हळद आणि तिखट घालून मॅरीनेट करा. १० मिनिटांनी कढईत तूप गरम करून त्यात मशरूम सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
त्याच कढईत अजून तूप घालून कांदे परतून घ्या आणि मग प्युरी मिक्स करा. तूप वेगळे होईपर्यंत शिजवा.
आता तळलेले मशरूम आणि हळूवारपणे एकत्र करा. त्यावर काही कढीपत्ता आणि लिंबाचा रस घाला. गरमागरम सर्व्ह करा.
NEXT: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे