Saam Tv
थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये काही महत्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
गुळ आणि शेंगदाणे त्वचेसाठीही उपयुक्त आहेत. गुळ त्वचेची चमक वाढवतो आणि शेंगदाणे जिवाणू प्रतिकारशक्ती वाढवतात.
सध्याच्या धावपळीमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात. त्यामुळे उशीरा जेवल्याने अन्न पचनासंबंधी समस्या उद्भवतात.अशावेळी जर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे एकत्र करुन खालात. तर अन्न चांगले पचते.
शेंगदाणे प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त असून गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने अशक्तपणा दूर होतो.Peanut And Jaggery
गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. त्यामुळे शेंगदाणे दात आणि हाडांसाठी फायदेशीर आहेत.
शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. यासोबत शरीराला ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते.
शेंगदाणे आणि गुळाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे मूड सुधारण्यास मदत होते.
NEXT: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?