AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Babar Azam Breaks Virat Kohli Record: पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे
babar azamyandex
Published On

Most Runs In T20I Cricket: पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना बाबर आझमने २८ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार खेचले. यादरम्यान त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीला मागे सोडलं आहे.

बाबर आझमने विराटला सोडलं मागे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ११७ धावांवर आटोपला. पाकिस्तानचे सर्व फलंदाज ढेपाळले. मात्र बाबरने ४१ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली.

यासह बाबर आझम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.त्याने विराटला मागे सोडलं आहे. विराटने ४१८८ धावा केल्या आहेत.

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे
IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

तर बाबरने आतापर्यंत ४१९२ धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा माजी खेळाडू रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितने ४२३१ धावा केल्या आहेत. रोहित आता नंबर १ ला असला, तरीदेखील बाबर लवकरच अव्वल स्थानी पोहचू शकतो. त्यानंतर विराट आणि रोहित त्याला कधीच मागे सोडू शकणार नाही. कारण, दोघांनीही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे.

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे
IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

४२३१ धावा – रोहित शर्मा (१४०.८९ स्ट्राइक रेट)

४१९२ धावा – बाबर आजम (१९२.२७ स्ट्राइक रेट)

४१८८ धावा – विराट कोहली (१३७.०७ स्ट्राइक रेट)

३६५५ धावा – पॉल स्टर्लिंग (१३४.८७ स्ट्राइक रेट)

३५३१ धावा – मार्टिन गप्टिल (१३५.७० स्ट्राइक रेट)

३३८९ धावा– जोस बटलर (१४७. ०२ स्ट्राइक रेट)

३३२९ धावा – मोहम्मद रिजवान (१२५.७१ स्ट्राइक रेट)

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचं काय खरं नाय..पर्थ कसोटीत भारताचा हा खतरनाक गोलंदाज करणार पदार्पण

विराट- रोहितचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने ४२३१ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी विराट कोहली होता. विराटने ४१८८ धावा केल्या आहेत. मात्र विराट आणि रोहित या रेकॉर्डमध्ये बाबर आझमला मागे सोडू शकणार नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर विराट आणि रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com