International Water Day 2024 : शरीराला पाण्याची किती आवश्यकता? जाणून घ्या

Water Day Information : आपल्या जीवनात पाण्याची भूमिका अधिक आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे.त्याचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो.
International Water Day 2024, Water Day Information
International Water Day 2024, Water Day InformationSaam Tv
Published On

Water Benefits For Health :

आपल्या जीवनात पाण्याची भूमिका अधिक आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे.त्याचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो.

जागतिक जल (Water) दिनाचे उद्दिष्ट लोकांना स्वच्छ (Clean) पाणी देण्याबाबत तसेच त्याचे संवर्धन करण्याबाबत जागरूक करणे हा आहे. आपले शरीर ६० टक्के पाण्याने बनलेले असते आणि जेव्हा शरीरात त्याची कमतरता असते तेव्हा अनेक समस्या उद्भवू शकतात.

शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी नसेल तर आपल्याला आरोग्याच्या (Health) अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शरीर डिहायड्रेट होत असेल तर हाडे, स्नायू आणि चेहरा इत्यादी गोष्टीवर परिणाम करते.

International Water Day 2024, Water Day Information
Pomegranate Information: या ५ लोकांनी चुकूनही खाऊ नका डाळिंब, आरोग्यावर होतील विपरीत परिणाम

1. पाण्याचा शरीरासाठी कसा फायदा होतो?

1. रक्त तयार करते

शरीरात पाणी नसेल तर रक्त तयार होत नाही. पाणी हा असा पदार्थ आहे जो लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतो ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवायचे असेल तर शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. रक्तवाहिन्या निरोगी ठेवते, बीपी संतुलित ठेवते आणि हृदय निरोगी ठेवते.

2. आतड्याची हालचाल सक्रिय करते

पाण्यामुळे पचनसंस्था, आतडे, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधरवते. पाण्यामुळे संपूर्ण शरीर व्यवस्थितरित्या डिटॉक्स होते. त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

International Water Day 2024, Water Day Information
Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा ड्राय-तेलकट का होते? कशी घ्याल काळजी?

3. मेंदूसाठी आवश्यक

मेंदूसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. हे पाणी मेंदूच्या पेशी निरोगी ठेवते. त्यानंतर त्याचे कार्य सुधारते. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते आणि मेंदूच्या पेशींचे वृद्धत्व कमी करते. मेंदूच्या ऊतींना निरोगी ठेवते ज्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्या उद्भवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com