कोमल दामुद्रे
डाळिंब हे अनेक आजारांवर बहुगुणी आहे. याचे सेवन केल्याने कर्करोग आणि हृदयविकाराची शक्यता कमी होते.
यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, आयर्न, पोटॅशियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात. काही लोकांना डाळिंब खाल्ल्याने त्रास होऊ लागतो.
जाणून घेऊया कोणत्या लोकांनी डाळिंब खाऊ नये याविषयी
जर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर डाळिंब खाणे टाळावे.
डाळिंब खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी असणाऱ्यांनी डाळिंब खाणे टाळावे.
खोकला झाल्यास डाळिंबाचे सेवन टाळावे. डाळिंबाचे सेवन केल्यास खोकल्याची समस्या अधिक वाढू शकते.
डाळिंब खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या उद्भवते. तसेच रक्ताभिसरण मंदावते.
जर तुम्ही मानसिक आजाराने त्रस्त असाल आणि औषधे घेत असाल तर डाळिंब खाणे टाळा. यामुळे मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.