Uttar Pradesh Crime: माजी जिल्हा पंचायत समिती सदस्याच्या हत्येचा बदला; जमिनीच्या वादावरून संपवलं अख्खं कुटंब

Deoria News : उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात मोठी धक्कादायक घटना घडलीय. जमिनीच्या वादावरून ६ जणांची हत्या झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजलीय.
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh CrimeSaam Tv

Uttar Pradesh Crime:

उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात हृ्दय हेलावून टाकणारी घटना घडलीय. येथील रुद्रपूरच्या परिसरात असलेल्या फतेहपूर गावात जमिनीच्या वादावरून ६ जणांची हत्या झालीय. यात ५ जण एकाच घरातील आहेत. मारेकऱ्यांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या केली. पती-पत्नी, दोन मुली आणि मुलाचा गळा कापल्यानंतर त्याच्यावर गोळ्या झा़डण्यात आल्या. आता या कुटुंबात फक्त ८ वर्षांचा मुलगा जिवंत आहे. पण तोही गंभीर आहे. (Latest News)

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गोरखपूरच्या आयुक्तांसह जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. या गावात तणावाचे वातावरण असून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फतेहपूर गावात राहणारे सत्य प्रकाश दुबे यांचा भाऊ साधू दुबे यांचा जमिनीवरून वाद होता. याचदरम्यान साधू दुबे यांनी काही दिवसाआधी त्यांच्या हिस्सेतील १० बिघ्याची जमीन दुसऱ्या गावातील माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांना विकली होती.

जमीन विकल्यानंतर ते प्रेमचंद यादव यांच्या घरी राहत होते. परंतु त्यांचे बंधू सत्य प्रकाश दुबे यांचा त्याला विरोध होता. त्यांच्यात हा वाद अनेक दिवसांपासून चालू होता. परंतु प्रेमचंद यादव हे दबंग वृत्तीचे व्यक्ती होते. त्यामुळे सत्यप्रकाश दुबे हे काही करू शकत नव्हते.

तीन महिन्यानंतर साधू दुबे हे गुजरातला निघून गेले. प्रेमचंद यादव यांनी घेतलेल्या जमिनीवर वाद चालू आहे. साधू दुबे हे गुजरातला गेल्यानंतर काही दिवसांनी प्रेमचंद यादव हे दुचाकीवर बसून त्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी सत्य प्रकाश दुबे यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यांच्या वादाचे रुपांतर हत्येत झाले.

सत्य प्रकाश दुबे आणि इतर लोकांनी प्रेमचंद यादवांच्यावर विटेने हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. गावातील इतर लोकांनी प्रेमचंद यादव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

केली पाच जणांची हत्या

या घटनेची माहिती प्रेमचंद यादव यांच्या घरच्यांना मिळाली. त्यानंतर संतापलेल्या यादव यांच्या घरच्यांनी सत्य प्रकाश दुबे यांच्या घरावर हल्ला चढवला. यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी दुबेंच्या घरातील लोक घरात लपून बसले होते. परंतु यादव यांच्या घरातील लोकांनी दुबे यांच्या घराचा दरवाजा तोडला आणि धारदार हत्यारानं दुबेच्या घरातील सदस्यांची हत्या करणं सुरू केलं. यात दुबे यांच्या घरातील पाच सदस्यांचा हत्या करण्यात आलीय. सत्य प्रकाश दुबे, त्यांची पत्नी किरण दुबे मुलगी नंदिनी, मुलगा गांधी दुबे अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

यादव कुटुंबाच्या हल्ल्यात प्रकाश दुबे यांचा लहान मुलगा अनमोल दुबे हा जखमी झाला आहे. त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रुद्रपूर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. परंतु पोलीस येईपर्यंत हल्लेखोर तेथून पळून गेले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा आणि जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.

जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून ६ जणांची हत्या झालीय. या घटनेमागे जमिनीचा वाद आहे, मात्र जमिनीच्या वादाशी संबंधित सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आले होते. परंतु त्यांचा वाद चालू होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने लगेच काही सांगता येणार नाही. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Uttar Pradesh Crime
BJP MP Video: खासदारानं भरसभेत दाबला महिला आमदाराचा हात; भाजप नेत्याचं गैरवर्तन व्हिडिओमध्ये कैद

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com