Delhi Blast CCTV Video Saam Tv
देश विदेश

Delhi Blast Video: दिल्ली स्फोटाचा पहिला VIDEO; लाल किल्ल्याजवळ सिग्नलवर कार आली अन् क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

Delhi Blast CCTV Video: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा पहिला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. सिग्नलवर वाहतूक कोंडी झाली त्याचवेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ ट्रॅफिक सिग्नलवर कारमध्ये भीषण स्फोट झाला

  • दिल्ली स्फोटाचा पहिला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला

  • स्फोटात १२ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले

  • स्फोटात वापरलेली कार स्फोटकांनी भरलेली असल्याचा संशय

दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी स्फोटाची भयंकर घटना घडली. स्फोट होतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या स्फोटाचा पहिला सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. लाल किल्ल्यासमोरील सिग्नलवर वाहनं उभी असताना अचानक एका कारमध्ये स्फोट झाला आणि भडका उडाला. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तारीख १० नोव्हेंबर २०२५ आणि वेळ १८:५०:५२ सेकंद दाखवली आहे. लाल किल्ल्यासमोरील चौकात अंधार दिसत असून मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. सिग्नलवर दुचाकी, कार आणि ऑटो रिक्षाच्या रांगा लागल्या आहे. ट्रॅफिक सिग्नल हिरवा झाला असता वाहनं हळूहळू पुढे जात होती तेवढ्यात भडका उडतो आणि अंधार होऊन जातो.

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील ट्रॅफिक सिग्नलवर एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. या स्फोटामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. स्फोटानंतर वाहनांचे, घराचे, मेट्रोचे नुकसान झाले. स्फोट झालेल्या कारचे तुकडे लाल किल्ल्याजवळील मंदिरावर जाऊन पडले. स्फोट झाल्यानंतर सर्वजण इकडे तिकडे धावत असल्याचे देखील व्हिडीओ समोर आले आहेत.

प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, स्फोटकांनी भरलेली कार जाणीवपूर्वक वर्दळीचे ठिकाण असलेल्या लाल किल्ला चौकात नेण्यात आली होती. त्यानंतर कारमध्ये स्फोट घडवून आणला होता. या स्फोटातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर उमर नबी आहे. जो जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील असून डॉक्टर आहे. स्फोट झाला तेव्हा तो कार चालवत असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचसोबत आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Accident: घराकडे जाताना भयंकर घडलं, भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT