Delhi Red Fort Blast: ...आणि शरीराचा तुकडा येऊन समोर पडला" प्रत्यक्षदर्शींनी सांगितला स्फोटाचा थरार | VIDEO

Eyewitness Describes Red Fort Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शी दीपक शर्मा यांनी त्या क्षणांचा थरारक अनुभव सांगितला आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मृतदेहाचे तुकडे मंदिराजवळ आढळले.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाचे पत्रकार दीपक शर्मा यांनी थरारक वर्णन केले आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास गेट क्रमांक एकजवळ मोठा स्फोट झाला, ज्यानंतर आगीचे मोठे लोळ उसळले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि लोक सैरावैरा पळू लागले. या स्फोटातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एका व्यक्तीच्या मृतदेहाचे काही भाग स्फोटानंतर सुमारे दीडशे मीटर अंतरावर असलेल्या गौरी शंकर मंदिराजवळ येऊन पडले. सुरुवातीला सिलेंडरचा स्फोट झाल्याची चर्चा होती, मात्र घटनेचे स्वरूप अत्यंत गंभीर होते. शर्मा यांनी सांगितले की, स्फोटानंतर त्यांनी आणि इतर नागरिकांनी घाबरून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. हा स्फोट दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com