Delhi Car Blast: दिल्ली स्फोटाचं पाक कनेक्शन उघड? डॉक्टर शाहीना हल्ल्याची मास्टरमाईंड?

Doctor Shahina Arrested: दिल्ली स्फोटामागचा क्रुर लेडी दहशतवादी चेहरा समोर आलाय.. या हल्ल्याचं थेट पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय.. मात्र या हल्ल्याची सुत्रधार डॉ. शायना कोण आहे? डॉ. शायनाचं पाकिस्तान कनेक्शन नेमकं काय आहे?
Delhi’s Red Fort area after the blast  investigators at the scene as agencies probe alleged JeM-linked Faridabad module.
Delhi’s Red Fort area after the blast investigators at the scene as agencies probe alleged JeM-linked Faridabad module.Saam Tv
Published On

राजधानी दिल्लीतील गजबजलेला लाल किल्ला परिसर भीषण स्फोटानं हादरला... आणि देशातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला... या भीषण दहशतवादी हल्ल्याने 13 जणांचे बळी घेतलेत...सुत्रांच्या माहितीनुसार या स्फोटाचे धागेदोरे फरिदाबाद मोड्युल आणि जैश ए मोहम्मद संघटनेपर्यंत पोहोचलेत..कारण स्फोटानंतर डॉ. शाहीना शाहीदच्या लखनऊमधून मुसक्या आवळल्यात....शाहीना शाहीद केवळ डॉक्टरच नाहीये तर तिचं कनेक्शन थेट पाकीस्तानबरोबर आहे.

शाहीना शाहीद ही जैश ए मोहम्मदच्या महिला विंग जमात उल मोमिनातची भारतीय कमांडर होती. याच जमात उल मोमिनातची पाकिस्तानातील प्रमुख सादिया अजहर ही मसूद अजहरची बहीण तर कंधार विमान हायजॅकचा मास्टरमाईंड युसूफ अजहरची पत्नी.... ((शाहीना भारतीय महिलांना भरती, ब्रेनवॉशिंग आणि नेटवर्कशी जोडण्याचं काम करायची..तर शाहीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हळुहळू ऑपरेशन सुरु केले होते.. एवढंच नाही तर शाहीना सातत्याने पाकिस्तानमधील आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होती. याच शाहीनाला फरिदाबाद मोड्युलचा पर्दाफाश केल्यानंतर अटक करण्यात आली.. आणि दहशतवादी डॉक्टरांचा भांडाफोड झाला

दिल्ली, काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेशात मोठे स्फोट घडवण्यासाठी फरिदाबादमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 2900 किलो अमोनियम नायट्रेट आणि स्फोटकं जमा केली.. आता शाहीनाच्या मुसक्या आवळल्यानं तिची सखोल चौकशी करायला हवी... एवढंच नाही तर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर राबवून भारताविरोधात नापाक दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना मातीत गाडण्याची गरज आहे.... आणि पाकड्याचं दहशतवाद्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com