Manasvi Choudhary
केसांच्या काळजीसाठी महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक आहार कधीही उत्तम असतो. गाजर आणि बीट यांचा रस हे केसांसाठी फायदेशीर आहे.
गाजर आणि बीट ज्यूस प्यायल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळं मजबूत होतात, परिणामी केस गळणे कमी होते.
गाजर आणि बीट ज्यूस बनवण्यासाठी गाजर, बीट, आले, लिंबू हे पुदिना पाने, काळे मीठ साहित्य एकत्र करा.
सुरुवातीला गाजर आणि बीट स्वच्छ धुवून घ्या. त्यांची सालं काढून मध्यम आकाराचे तुकडे करा. आल्याचाही लहान तुकडा सोलून घ्या.
मिक्सरमध्ये गाजर, बीट आणि आले टाकून त्यात थोडे पाणी घाला आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
या रसामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ टाका. यामुळे ज्यूसची चव वाढते
गाजर, बीट ज्यूस बनवल्यानंतर १५ ते २० मिनिटांच्या आत सर्व्ह करा म्हणजे फायदा होईल.