Brahmani Nauvari Saree: ब्राम्हणी स्टाईल नऊवारी साडी कशी नेसायची? पाहा सोपी स्टाईल

Manasvi Choudhary

साडी

साडी नेसणं ही देखील एक कला आहे. साडीमध्ये देखील तुम्हाला परफेक्ट दिसायचं असेल तर तुम्ही परफेक्ट साडी नेसणं गरजेचे आहे.

Brahmani Nauvari Saree

ब्राम्हणी साडी

साडीचे देखील अनेक प्रकार आहेत तुम्ही विविध प्रकारे खास साडी नेसू शकता. ब्राम्हणी नऊवारी साडी हा सध्या ट्रेडिंगचा साडी नेसण्याचा प्रकार आहे.

Brahmani Nauvari Saree

साडी नेसण्याची सोपी पद्धत

ब्राम्हणी स्टाईल नऊवारी साडी नेसणे अनेकांना जमत नाही यासाठी आज आम्ही तुम्हाला साडी नेसण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

Brahmani Nauvari Saree

पॅन्ट घाला

सर्वातआधी ब्राम्हणी साडी हा नऊवारी साडी स्टाईल असल्याने या साडीमध्ये पेटीकोट न घालता तुम्हा पॅन्ट किंवा लेगींज घालावी लागणार आहे.

Brahmani Nauvari Saree

साडी कमरेभोवती गुंडाळा

सुरूवातील साडीचा एक टोक उजव्या बाजूने कमरेभोवती गुंडाळायचा आहे. यानंतर समोरच्या बाजूने साडीची गाठ मारा.

Brahmani Nauvari Saree | yandex

साडीच्या निऱ्या नीट करा

साडीची गाठ माल्यानंतर उरलेला साडीचा भाग दोन्ही पायांच्या मधून मागे न्यायचा आहे. पाठच्या बाजूला काठाच्या मदतीने साडीच्या निऱ्या काढून कमरेत खोचा. यालाच कास्टा असे म्हणतात. तो नीट असावा यामुळे साडी छान दिसते.

Brahmani Nauvari Saree

पदर पिनअप करा

आता समोर उरलेल्या साडीच्या भागातून पदर काढा. पदराच्या निऱ्या करून तो डाव्या खांद्यावर पिनअप करा. ब्राम्हणी साडीचा पदर थोडा लांब ठेवल्यास तो अधिक सुंदर दिसतो.

Brahmani Nauvari Saree | yandex

निऱ्या नीट करा

पदर लावल्यानंतर जो मधला भाग उरतो, त्याच्या निऱ्या करा. या निऱ्या करताना त्या डाव्या बाजूला झुकलेल्या असाव्यात. या निऱ्यांना 'ओचा' म्हणतात. या निऱ्या नीट करून कमरेत खोचा.

Brahmani Nauvari Saree | yandex

ब्राम्हणी साडी स्टाईल

ब्राम्हणी स्टाईलमध्ये समोरचा भाग थोडा वर उचललेला असतो. पायांजवळ साडी व्यवस्थित सेट करा जेणेकरून चालताना अडथळा येणार नाही.

Brahmani Nauvari Saree | yandex

next: Linen Or Cotton Silk Saree Designs: ऑफिसमध्ये तुम्हीच दिसाल स्टायलिश, प्रोफेशनल लूकसाठी नेसा 'लिनन आणि कॉटन सिल्क साडी'

Linen Or Cotton Silk Saree Designs
येथे क्लिक करा...