मोठी बातमी! बड्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; आयोगावर मुख्यमंत्री संतापल्या

Political Storm In Bengal Over Sudden IAS, IPS Transfers Before Polls: पश्चिम बंगाल निवडणुकीआधी वरिष्ठ IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्यांवरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
West Bengal Chief Minister reacts strongly to sudden transfer of top IAS and IPS officers ahead of state elections.
West Bengal Chief Minister reacts strongly to sudden transfer of top IAS and IPS officers ahead of state elections.Saam Tv
Published On

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक वरिष्ठ IAS आणि IPS बदल्यांवरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हणाल्या की, निवडणुक आयोगाद्वारे 15 आणि 16 मार्च दरम्यान अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुख्य सचिव, गृहसचिव आणि पोलीस महानिरीक्षकांचा समावेश आहे. कुठल्याहे ठोस कारण नसताना या आदधिकाऱ्यांचा बदल्या केल्या गेल्या असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

West Bengal Chief Minister reacts strongly to sudden transfer of top IAS and IPS officers ahead of state elections.
Politics: महाराष्ट्रापासून ते बिहार-ओडिशापर्यंत भाजपचा विजय, पण हरियाणात फक्त ०.३ टक्क्यांनी कसा झाला पराभव? वाचा सविस्तर

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली नाराजी

बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या की, निवडणुक आयोगाला त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक कामात गुंतलेले आहे. मागच्या निवडणुकीवेळी देखील निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदली केल्या होत्या. यामुळे निवडणुकीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे, पश्चिम बंगाल विधानसभेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करणारे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच पश्चिम बंगाल राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांना पदावरून हटवण्यात आले आहे, ही अत्यंत चिंतेची आणि आश्चर्याची बाब आहे, असे मुख्यमंत्री ममता म्हणाल्या. राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांची परवानगी न मागता आणि मागील निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोग (ECI) आणि राज्याच्या संस्थांच्या कामकाजाला मार्गदर्शन करणाऱ्या प्रस्थापित प्रथेचे पालन न करता, हे मनमानीपणे करण्यात आले आहे.

West Bengal Chief Minister reacts strongly to sudden transfer of top IAS and IPS officers ahead of state elections.
MBBS चा विद्यार्थी गोत्यात! दुबईच्या पोराला गाडी देणं पडलं महागात; मुंबईतील प्रतिकच्या मृत्यूला जबाबदार कोण?

भावनेला आणि आपल्या लोकशाही प्रणालीच्या तत्त्वांनाही धक्का पोहोचतो, जी आपल्या घटनात्मक शासनाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. भारताचा निवडणूक आयोग, एक सर्वोच्च घटनात्मक संस्था म्हणून, केवळ आपल्या अधिकारांचा वापर करणेच नव्हे, तर भारताच्या संघराज्यीय संरचनेत अंतर्भूत असलेल्या भावना आणि मूल्यांचे पालन करणे देखील अपेक्षित आहे.

बंगालमध्ये दोन टप्प्यांत होणार निवडणुका

रविवारी, निवडणूक आयोगाने बंगालसह उर्वरित राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यावेळी बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ विधानसभा जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४२ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. मागील विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सात ते आठ टप्प्यांत मतदान झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com