Delhi Air Pollution News  Twitter/@ANI
देश विदेश

Delhi Air Pollution Update : दिल्लीची हवा बनली जीवघेणी, नागरिकांना श्वास घेणेही मुश्कील; आज हवेची गुणवत्ता कशी?

Delhi Latest News : आनंद विहारचा हवेचा AQI 499 वर गेला आहे. इंडिया गेट आजचा AQI 492 वर आहे.

प्रविण वाकचौरे

Delhi Air Pollution :

दिल्लीतील हवा आजही अतिशय खराब आहे. दिल्ली, नोएडा आणि आजूबाजूच्या परिसरातील हवा दुषित दिसत आहे. सर्वात खराब हवा आनंद विहारमध्ये असल्याचं दिसून आलं आहे. आनंद विहारचा हवेचा AQI 499 वर गेला आहे. इंडिया गेट आजचा AQI 492 वर आहे.

काल सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करत आहात असा सवाल राज्यांना विचारला होता. तात्काळ पराळी जाळणे बंद करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले होते.

दिल्लीतील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्यादेखील जाणवत आहेत. खराब हवेमुळे नागरिकांना श्वास घेणेही मुश्कील बनले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी बाळगण्याचं आवाहन देखील नागरिकांना प्रशासनाकडून केलं जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दिल्लीतील मुख्य पृष्ठभागावरील वारे दक्षिण-पश्चिम आणि ईशान्य दिशांकडून ताशी चार ते आठ किमी वेगाने वाहत होते. दिवसा ऊन आणि रात्रीच्या तापमानात सुमारे 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झाली. वाऱ्याची दिशा आणि अनुकूल हवामान बदलून प्रदूषणात थोडीशी सुधारणा नोंदवण्यात आली. (Latest News)

दिल्लीच्या निम्म्या भागात AQI 400 पार

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील अर्ध्याहून अधिक केंद्रांमध्ये प्रदूषणाची पातळी 400 च्या वर गेली. आनंद विहारमध्ये सर्वाधिक AQI नोंदवला गेला.

शादीपूर, RK पुरम, पंजाबी बाग, मथुरा रोड, IGI विमानतळ, नेहरू नगर, द्वारका सेक्टर 8, पटपरगंज, डॉ. करण सिंग शूटिंग रेंज, जहांगीरपुरी, रोहिणी, विवेक विहार, नरेला, ओखला, मुदंका, आनंद विहार येथे AQI 400 पेक्षा जास्त नोंदवला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

SCROLL FOR NEXT