Deepfake Video Row : डीपफेकचे काय आहेत नियम? किती वर्षांची होऊ शकते शिक्षा जाणून घ्या

Deepfake : डीपफेकद्वारे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार केले करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ....
Deepfake Video
Deepfake Video saam Tv
Published On

Deepfake Video Photo law And Punishment :

दोन दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने नवा सुरू झालाय. कतरिना कैफचाही एक डीपफेक फोटो व्हायरल होत आहे. ‘टायगर ३’मधील एक सीन मॉर्फ्ड करून तो फोटो व्हायरल केला जात आहे. दरम्यान या प्रकरावर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय. (Latest News)

यानंतर केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला निर्देश दिलेत. केंद्राने सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला हे सगळे फोटो आणि कंटेंट येत्या २४ तासांत काढून टाकण्याचे निर्देश दिलेत. हे प्रकार समोर आल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान डीपफेकच्या विरोधात नियम बनवण्याची गरज असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या घटनांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार हा एक गुन्हा आहे. डीपफेकद्वारे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार केले करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ....

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कायद्याच्या कलम ६६ ई अंतर्गत परवानगीशिवाय कोणाचेही फोटो आणि व्हिडिओ बनवल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि २ लाख रुपये दंडाची तरतूद आहे. या नियमांतर्गत गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येते. जर एखाद्याने कोणाचे वैयक्तिक फोटो परवानगी न घेता काढले किंवा शेअर केले तर त्या व्यक्तीवर या नियमानुसार कारवाई केली जाते.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ च्या कलमानुसार सॉप्टवेअर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कोणाचे अश्लील फोटो तयार केल्यास किंवा त्याला शेअर केल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षाचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येतो. दरम्यान आरोपी व्यक्तीने हे कृत्य परत परत केलं तर त्याला ५ वर्षाचा तुरुंगवास आणि १० लाख रुपयांचा दंड सुनावण्यात येतो. डीपफेक आढळल्यास, आयपीसीच्या कलम६६ क, ६६ ई आणि ६७ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये आयपीसी कलम १५३ अ आणि २९५ अ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यावर कारवाई केली जाते.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही डीपफेकविरोधात तक्रार करण्यासाठी या नियमांची आठवण करून दिलीय. यामध्ये आयटी नियम २०२३ नमूद करण्यात आले आहे तसेच आयपीसीचाही उल्लेख करण्यात आलाय. मात्र डीपफेक कसे ओळखायचे कसे,असा प्रश्न उपस्थित होत आहे ?

डीपफेक कसे ओळखायचे

  • चेहरा पट्टी, केसांच्या रेषा, भुवया, चष्म्याच्या सीमा पाहून डीपफेक फोटो आणि व्हिडिओ ओळखले जाऊ शकतात.

  • डीपफेक व्हिडिओ प्ले केल्यावर डोळ्यांच्या आणि डोक्याच्या हालचालींवरून ओळखले जाऊ शकते.

  • AI जनरेट केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये हात आणि पायांची लांबी सारखी नसते. अशा प्रकारे असे व्हिडिओ ओळखले जाऊ शकतात.

Deepfake Video
Deepfake Video Row : रश्मिका मंदानानंतर शुभमन गिल-सारा तेंडुलकरचा डीपफेक फोटो होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com