Cyclone Alert News Saam tv
देश विदेश

Cyclone Alert : १२३ लोकांचा बळी घेतला, 'दितवाह' चक्रीवादळानं भारताकडं वळवला मोर्चा; कोणत्या राज्यांना फटका बसणार?

Cyclone Alert News : 'दितवाह' चक्रीवादळानं भारताकडं मोर्चा वळवला आहे. या वादळाने आतापर्यंत १२३ लोकांचा बळी घेतला आहे.

Vishal Gangurde

दितवाह चक्रीवादळानं श्रीलंकेत घेतला 123 लोकांचा बळी

चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकत आहे

या वादळाचा सर्वाधिक धोका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्याला बसणार आहे.

केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि पुड्डूचेरीमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

दितवाह चक्रीवादळ गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरावर घोंघावत आहे. या वादळाने श्रीलंकेत कहर केला आहे. मागील ४८ तासांत दितवाह वादळाने १०० हून अधिक बळी घेतले आहेत. १२३ लोकांचा बळी घेतलेल्या चक्रीवादळाने भारताकडे मोर्चा वळवला आहे.

दितवाह चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील ५ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू, आंध्र प्रदेशला बसण्याची शक्यता आहे. तर या व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक, पुड्डूचेरी आणि तेलंगणातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने मुसळधार पावसासह रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे उत्तर भारतात हवेत गारवा निर्माण झाला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वायव्य भारतात तापमान हे २ ते ४ अंश सेल्सियसने कमी होण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये थंडीची लाट येत आहे.

दितवाह भारतात कधी पोहोचणार?

दितवाह चक्रीवादळ ७ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्या चक्रीवादळ पुड्डुचेरीहून ३३० किलोमीटर दूर आणि चेन्नईच्या दक्षिणेस ४३० किमी अंतरावर, श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर केंद्रीत आहे.

श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी दितवाह चक्रीवादळाने कहर केला. पूर आणि भूस्खलनात ६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या चक्रीवादळामुळे डझनभर लोक बेपत्ता आहेत. या घटनेनंतर भारत सरकारने शेजारी राष्ट्र श्रीलंकेला तातडीने मदत पाठवली होती. हेच वादळ भारताच्या हद्दीत शनिवारी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT