पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

pune metro News : केंद्र सरकारने पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्णयाने पुण्यात मेट्रोचं जाळं आणखी विस्तारणार आहे.
pune metro phase 2
pune metro News : Saam tv
Published On
Summary

पुणेकरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्राच्या प्रकल्पाने पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

केंद्राकडून मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

पुण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते अपरे पडू लागले आहेत. त्यामुळे दिवस असो वा रात्री पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचा अर्धा वेळ रस्त्यातच जातो. या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी मंजुरी देली आहे. केंद्राने खराडी-खडकवासला (लाइन ४) आणि नळ स्टॉप- वारजे- माणिक बाग (लाइन ४अ) या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिलाय.

pune metro phase 2
देव तारी त्याला कोण मारी...! गॅलरीतून पडलेला सव्वा वर्षांचा चिमुकला चमत्कारिकरीत्या बचावला, थरार कॅमेऱ्यात कैद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा २ (Phase-2) मधील मार्गिका ४ आणि मार्गिका ४ अ याला मान्यता देण्यात आली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांची वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची मदत होणार आहे. तसेच या निर्णयाने शहराच्या विकासात नवी गती मिळणार आहे.

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची मार्गिका 4 (खराडी ते खडकवासला) ची लांबी 25.52 किमी असणार आहे. यात २२ स्थानके असतील. हा मार्ग खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत असणार आहे. मार्गिका ४अ (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) ही 6.12 किमी लांबीची असणार आहे. यात 6 उन्नत स्थानके असतील.

pune metro phase 2
स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी 31.64 किमी आणि स्थानकांची एकूण संख्या 28 आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 9857.85 कोटी खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे.

pune metro phase 2
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या जवळच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील महत्त्वाचे भाग थेट जोडले जातील, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल. या नवीन मार्गिका पुणे शहराच्या तीन मुख्य दिशांना (पूर्व, मध्य आणि पश्चिम/दक्षिण-पश्चिम) जोडतील. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांना कोणत्याही दिशेला प्रवास करणे सोपे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com