Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

Vidhan Bhavan Threat Mail News: विधानभवनाला उडवून देण्याचा मेल सकाळी आला होता. या मेलमध्ये नेमकं काय लिहलंय हे आता समोर आले आहे. मेल साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

आज सकाळी विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याचा मेल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विधानभवन परिसरात तपासणी सुरु केली. विधानभवानंतर मुंबईतील ४ ठिकाणं उडवून देण्याची धमकी देण्यात आला आहे. आता हा मेल साम टीव्हीच्या हाती लागला आहे. या ई मेलमध्ये खलिस्तानला पाठिंबा देण्याचा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांनी खलिस्तानला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली आहे. मोदी, शाह आणि जयशंकर यांनाही दिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खलिस्तान नॅशनल आर्मीच्या चौघांचा यामध्ये समावेश आहे. या मेलमध्ये इंजिनिअर गुरनाखसिंग, रुकन शाहवाला यांची नावं लिहली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com