Indian Railway : वंदे भारत, नमो भारत की अमृत भारत? काय असतात सुविधा, सर्वात भारी कोणती ट्रेन?

Indian Railway update : भारतीय रेल्वेकडून वंदे भारत, नमो भारत की अमृत भारत ट्रेन चालवल्या जातात. या ट्रेनमधील सर्वात भारी ट्रेन कोणती? जाणून घ्या.
Indian Railway update news
Indian Railway update Saam tv
Published On
Summary

भारतीय रेल्वेच्या वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत या तीन आधुनिक ट्रेन

वंदे भारत ट्रेन वेग, आराम आणि स्लीपर व्हर्जनमुळे लोकप्रिय .

नमो भारत ट्रेनमध्ये महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी अत्याधुनिक सुरक्षा आणि सुविधा

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये आधुनिक कोच, फायर डिटेक्शन, ऑटोमॅटिक टॉयलेट सिस्टम आणि आरामदायी सुविधा

भारतीय रेल्वेमध्ये वर्षानुवर्षे मोठे बदल होताना दिसत आहेत. रेल्वेकडून आता वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. या तिन्ही ट्रेनला त्रिवेणी संबोधलं जातं. तिन्ही ट्रेनविषयी जाणून घ्या.

देशात आता ८२ वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. वंदे भारतची एक चेअरकार ट्रेन देखील आहे. २०१९ साली वंदे भारत लाँच झाल्यानंतर ट्रेनच्या स्पीड आणि कम्फर्टबाबत जोरदार चर्चा होत आहे. भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसचा स्लीपर व्हर्जन देखील लाँच करणार आहे. चेअरकार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर आहे. आता २०२६ साली वंदे भारत ट्रेनमधून स्लीपरमधूनही प्रवास करण्यास मिळेल.

Indian Railway update news
ICC कडून टी20 विश्वचषकाचे शेड्युल जाहीर; भारत-पाकिस्तानचा पहिला सामना कधी?

नमो भारत ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा?

नमो भारत रॅपिड रेल्वे ही इतर ट्रेनच्या तुलनेत हटके आहे. या ट्रेनमध्ये खास सुविधा मिळत आहेत. नमो भारत रॅपिड रेल्वेमध्ये महिला,ज्येष्ठ, दिव्यांगाना सीटसाठी खास आरक्षण देण्यात आलं आहे. ट्रेनमध्ये महिलांसाठी एक कोच आरक्षित आहे. नमो भारत ट्रेनमध्ये व्हीलचेअर-स्ट्रेचरसाठी खास स्पेस आहे. प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये एक अटेंडेंट उपलब्ध आहे.या ट्रेनमध्ये कोचमध्ये दरावाजांवर पॅनिक बटन देखील उपलब्ध आहे.

Indian Railway update news
RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

अमृत भारत ट्रेनच्या नॉन-एसी कोचमध्ये फायर डिटेक्शन सिस्टम देखील दिली आहे. या व्यतिरिक्त टॉकबॅक यूनिट आणि गार्ड रुममध्ये रिस्पॉन्स यूनिट सुरक्षा देखील आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेक विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये सेमी ऑटोमॅटिक कपलर असून कोच जोडताना कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही.

Indian Railway update news
महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

अमृत भारत एक्स्प्रेसच्या कोचमध्ये अनेक आधुनिक फिचर देखील देण्यात आले आहेत. फोल्डेबल स्नॅक्स टेबल, मोबाइल होल्डर , रेडियम फ्लोर स्ट्रिप्स, आरामदायी सीट देखील देण्यात आल्या आहेत. शौचालयातही इलेक्ट्रोन्यूमेटिक फ्लशिंग सिस्टम, ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सर आणि फायर सप्रेशन सिस्टम सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठी खास शौचालय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर फास्ट चार्जिंग पोर्ट, पेन्ट्री कार सारख्या सुविधा देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com