Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Mumbai water Issue : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तर काही भागात पाणीपुरवठा बंद राहील.
Mumbai news
Mumbai water Issue Saam tv
Published On
Summary

मुंबईत १ ते २ डिसेंबरदरम्यान ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबईत बोगदा शाफ्टशी जोडण्याचे काम सुरू

पालिकेच्या कामामुळे मुंबईतील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर आणि एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस, एन विभाग प्रभावित होणार

बीएमसीने नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केलंय

मुंबईत भूमिगत बोगदा शाफ्ट जोडणीसाठी ३००० मिलीमीटर जलवाहिनीवर २५०० मिलीमीटर जलवाहिनीची छेद जोडणी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील ११ विभागांमध्‍ये सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने, तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

Mumbai news
Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील छेडा नगर जंक्शन परिसरात असलेल्या ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी छेद जोडणी करण्यात येणार आहे. १ डिसेंबर रोजी १० वाजेपासून ते दुसर्‍या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत म्‍हणजेच एकूण ३० तास हे कामकाज करण्‍यात येणार आहे.

पालिकेच्या कामकाजामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्‍तर विभाग आणि पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस व एन विभागाचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहेत. या कालावधीत मुंबईतील काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. तसेच काही विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mumbai news
Indian Railway : वंदे भारत, नमो भारत की अमृत भारत? काय असतात सुविधा, सर्वात भारी कोणती ट्रेन?

पालिकेच्या जलवाहिनीच्या कामामुळे एकूण १४ प्रशासकीय विभागांतील पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जपून पाणी वापरावे लागणार आहे. पालिका प्रशासनाने आवाहन करताना म्हटलं की, नागरिकांनी या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com