Corona Update Maharshtra Saam Tv
देश विदेश

Corona Update News : चिंताजनक! देशात JN.1 व्हेरियंट संक्रमितांचा आकडा 1200 पार

Corona Update : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं समोर येतंय. देशभरात JN.1 व्हेरियंट संक्रमितांचा आकडा 1200 पार झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Corona JN.1 Variant Patients

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळं प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशात रोज नव्या कोरोना रुग्णांची भर पडतच आहे. कोरोना संक्रमितांची संख्या देखील झपाट्याने वाढतेय. (latest corona update)

कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ

कोरोनाच्या वाढत्या रुग्णा संख्येमुळं प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागील महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालीय. या रूग्णांमध्ये नवीन JN.1 चे रुग्ण जास्त आहेत. ही चिंताजनक बाब आहे. देशात नवीन JN.1 कोरोना व्हेरियंट संक्रमितांचा आकडा 1200 च्या पुढे पोहोचला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

JN.1 या सब-व्हेरियंटचे रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी केली आहे. त्या आकडेवारीनुसा देशात मागील २४ तासांत ६०९ नवीन कोरोना संक्रमित आढळले आहेत. तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. देशात नवीन कोरोना व्हेरियंट JN.1 हा वेगानं पसरत आहे.

अतिशय वेगाने संसर्ग

JN.1 सब-व्हेरियंट सर्वाधिक संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. त्याचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. देशभरात JN.1 या सब-व्हेरियंटचे 1200 हून अधिक रुग्ण आढळत आहेत, त्यामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ताप येणं, लवकर थकवा येणं, सारखा खोकला येणं, सर्दीमुळे नाक बंद होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी, अतिसार, सर्दी ही JN.1 या सब-व्हेरियंटची लक्षणे आहेत.

कोणत्या राज्यात किती रुग्ण

भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियमने याबाबत नवी आकडेवारी जारी केलीय. त्यानुसार JN.1 सब-व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण हे कर्नाटकमध्ये आढळले आहेत. JN.1 सब-व्हेरियंटचे कर्नाटकमध्ये 215 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर आंध्रप्रदेश हे राज्य आहे. आंध्रप्रदेशमध्ये 189 रुग्णांची नोंद झालीय. महाराष्ट्रात देखील नवीन JN.1 सब-व्हेरियंटचा प्रसार वेगाने होतोय. आतापर्यंत 170 रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये 154 रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये 96 रुग्ण, गोव्यात 90 रुग्ण, तामिळनाडुमध्ये 88 रुग्ण आणि गुजरातमध्ये 76 रुग्ण तेलंगणा आणि राजस्थानमध्ये 32 रुग्ण, छत्तीसगडमध्ये 25 रुग्ण, दिल्लीमध्ये 16 रुग्ण, उत्तर प्रदेशात 7 रुग्ण, हरियाणामध्ये 5 रुग्ण, ओदिशामध्ये 3 रुग्ण याशिवाय उत्तराखंड आणि नागालँडमध्ये एक-एक रुग्णांची नोंद झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT