Tanaji Sawant On Right To Health Law
Tanaji Sawant On Right To Health LawSaam tv

Right To Health Law: सरकार राज्यात आणणार 'राईट टू हेल्थ' कायदा? काय म्हणाले आरोग्यमंत्री, जाणून घ्या

Tanaji Sawant On Right To Health Law: 'राईट टू हेल्थ' कायदा आणणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत.

Tanaji Sawant On Right To Health Law:

'राईट टू हेल्थ' कायदा आणणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. आज शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात 50 खाटांचे सी सी यू ,आय पी एच एल प्रयोगशाळा आणि डी ई आय सी फेझ 2 या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते.

सावंत म्हणाले, यापूर्वी जागरूक पालक सुदृढ बालक, माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आणि आभा कार्ड अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन घेत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tanaji Sawant On Right To Health Law
BJP Lok Sabha Election Plan: लोकसभेसाठी भाजपची नवीन रणनीती! 70 वर्षांवरील नेत्यांना डच्चू, तरुणांना संधी? नेमका काय आहे प्लान? जाणून घ्या

ते म्हणाले, सध्या तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन होत आहे. त्यामुळे "आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे" हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  (Latest Marathi News)

तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सावंत यांनी निर्देश दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक अर्चना भोसले यांनी, सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी मानले.

Tanaji Sawant On Right To Health Law
Shinde VS Pawar: अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? नेमकं कारण काय?

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थीनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com