BJP Lok Sabha Election Plan: लोकसभेसाठी भाजपची नवीन रणनीती! 70 वर्षांवरील नेत्यांना डच्चू, तरुणांना संधी? नेमका काय आहे प्लान? जाणून घ्या

Maharashtra Politics: लोकसभेसाठी भाजपाकडून नव्या रणनीतीची चाचपणी सुरू आहे. काय आहे भाजपची नवीन रणनीती आणि का आखावी लागली भाजपला ही रणनीती? याचबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ...
Pm Modi and Amit Shah
Pm Modi and Amit ShahSaam Tv
Published On

BJP Lok Sabha Election Plan:

येत्या काही महिन्यातच देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप एकाच वेळी वेगवेगळ्या मुद्यांवर काम करत आहे. निवडणुकांची तिकीट देताना वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत. आता भाजपाकडून नव्या रणनीतीची चाचपणी सुरू आहे. काय आहे भाजपची नवीन रणनीती आणि का आखावी लागली भाजपला ही रणनीती? याचबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ...

भाजप 40 ते 55 वर्षाच्या उमेदवारांना निवडणुकीत उतरवणार?

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतस सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. या बैठकांमध्ये निवडणुकांची रणनीती काय असावी? यावर मंथन केलं जात आहे. लोकसभेच्या सत्तेची हॅट्रीक मारण्यासाठी संसदेत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर भाजपचा भर आहे. त्यामुळं उमेदवारी देताना भाजपकडून कुठलीही रिस्क घेतली जाणार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Modi and Amit Shah
Shinde VS Pawar: अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? नेमकं कारण काय?

आता उमेदवारी देताना भाजपकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याची माहिती चर्चा आहे. त्यासाठी मोदी आणि भाजपनं मेगाप्लान तयार केल्याचं, सूत्रांचं म्हणणं आहे. या प्लाननुसार 2024 च्या लोकसभेत मोदींसोबत यंग खासदारांची फळी असणार आहे.  (Latest Marathi News)

काय आहे भाजपचा नवा प्लान?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 65 टक्के तरुण, या तरुण मतांवर भाजपचा डोळा आहे. एकालाच 4-5 वेळा तिकीट दिलं तर नवीन कार्यकर्ता दूर जाण्याची भीती आहे. त्यामुळं त्याला नाराज न करता संधी देण्यावर भाजपचा भर असेल. 55 ते 70 वर्षाच्या खासदारांच्या जागी 40 ते 55 वयोगटातील चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न भाजपचा असेल.

Pm Modi and Amit Shah
Modi Govt Schemes: मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

सूत्रांनी सांगितलं की, लोकसभेत सध्या 25 ते 55 वयोगटातील खासदारांचा टक्का 53% आहे. 70 पारच्या सदस्यांची संख्या जवळपास 150 पर्यंत होते. जिथे सत्तरीच्या वरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार नाही, तिथे तरुण चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. जिथे 3 टर्म झालेल्या खासदारांचं तिकीट कापणार, तिथे तरुण उमेदवार उतरवणार. मतदारांमध्ये तरुणांचा टक्का जास्त आहे, त्याचा फायदा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

दरम्यान, दरवेळी निवडणुकांना सामोर जाताना भाजप नवा मुद्दा घेऊन पुढे जात असते, प्रत्येकवेळी एका घटकाला टार्गेट करून त्यांच्या मतांवर भाजप विजय मिळवत असल्याचं आतापर्यंत दिसलं आहे. यावेळीही भाजपनं वेगळी रणनीती आखल्यामुळं त्याचा पक्षाला फायदा होणार का? हे येत्या काळात कळू शकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com