Modi Govt Schemes: मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

PM Kisan Mandhan Yojana: देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात.
PM Kisan Mandhan Yojana
PM Kisan Mandhan YojanaSaam Tv
Published On

PM Kisan Mandhan Yojana:

देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात. अनेक शेतकरी एका विशिष्ट वयापर्यंत शेती किंवा मजूर करून आपला उदरनिर्वाह करतात. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर, त्यांच्या जीवनात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो.

शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार एक योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Kisan Mandhan Yojana
LIC ची ही Scheme तुम्हाला बनू शकते लखपती, फक्त 200 रुपये वाचून मिळू शकतात 28 लाख; काय आहे योजना?

कोण करू शकतो अर्ज?

या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी भारत सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेत अर्ज करू शकतात आणि गुंतवणूक सुरू करू शकतात. तुम्ही या योजनेसाठी ज्या वयात अर्ज करता, त्या वयाच्या आधारे गुंतवणुकीची रक्कम ठरवली जाते. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

जर शेतकऱ्यांनी वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला. अशातच त्यांना या योजनेत दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच जेव्हा गुंतवणूक करणारा शेतकरी 60 वर्षांचा होईल, त्यानंतर त्याला दरमहा 3,000 रुपये (वार्षिक 36,000 रुपये) पेन्शन मिळेल.

PM Kisan Mandhan Yojana
Investment Tips: फक्त 8,000 रुपयांची बचत करा आणि करोडपती व्हा! या योजनेत गुंतवणूक करून मिळू शकतात 5.2 कोटी

या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला दरमहा 50 टक्के पेन्शन मिळते. शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला दरमहा 1500 रुपये पेन्शन मिळेल. यातच तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. भारत सरकारच्या या योजनेत देशभरातील अनेक शेतकरी अर्ज करत आहेत आणि गुंतवणूक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com