आपल्यापैकी अनेकांना आपल्या भविष्याची चिंता असते. अशातच अनेकजण निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्या कमाईतील काही भाग बँकेत ठेवी (FD) म्हणून जमा करतात. मात्र महागाई जशी वाढत आहे, तसे बँकेत ठेवीवर तितके व्याजदर आपल्याला मिळत नाही.
यातच तुमची बचत बँकांमध्ये ठेवण्याऐवजी तुम्ही ती चांगल्या ठिकाणी गुंतवावी. जेणेकरून तुम्हाला कालांतराने त्यावर चांगला परतावा मिळत राहील. तुम्ही तुमची बचत कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत गुंतवू शकता. येथून परतावा मिळण्याची शक्यता चांगली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मोठा निधी गोळा करू शकता. यामध्येच तुम्ही फक्त 8,000 रुपयांची बचत करून 5.2 कोटी रुपये कसे मिळवू शकता? काय आहे हे गणित, ते समजून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वातआधी तुम्हाला चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल. चांगली म्युच्युअल फंड योजना निवडण्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. म्युच्युअल फंड योजना निवडल्यानंतर, तुम्हाला त्यात एसआयपी करावी लागेल. (Latest Marathi News)
एसआयपी (SIP) केल्यानंतर तुम्हाला 35 वर्षांसाठी दरमहा 8,000 रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणूक करताना तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवू.
सगळं गणित नीट बसलं तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 5.2 कोटी रुपये सहज मिळू शकतात. हा पैसा तुम्हाला भविष्यात आर्थिक मदत करेल. या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल.
डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जर तुम्ही व्यवस्थित माहिती न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर अवलंबून असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.