तुम्हीही तुमच्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी चांगल्या योजनते गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एका अतिशय चांगल्या गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युरिटीच्या वेळी चांगली रक्कम मिळवू शकता.
आम्ही म्युच्युअल फंड योजनेबद्दल बोलत आहोत. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. परंतु गुंतवणुकीच्या या क्षेत्रात परतावा मिळण्याची शक्यता देखील खूप जास्त असते. गुंतवणुकीच्या या क्षेत्रातून अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. तुम्ही दरदरोज 166 म्हणजेच महिन्याला 5 हजार रुपये गुंतवून 33.4 लाख रुपये मिळवू शकता. ते कसं याचबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
यासाठी सर्वात आधी तुम्हाला चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल. याबद्दल तुम्हाला चांगली आर्थिक माहिती नसेल, अशा परिस्थितीत तुम्ही तज्ञांच्या मदतीने चांगली म्युच्युअल फंड योजना निवडू शकता. (Latest Marathi News)
असे झाल्यास, 17 वर्षांनंतर तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 33.4 लाख रुपये जमा करू शकाल. गुंतवणुकीच्या कालावधीत तुम्हाला एकूण 10.2 लाख रुपये गुंतवावे लागतील. तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 23.2 लाख रुपयांची संपत्ती वाढेल. तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेले 33.4 लाख रुपये वापरू शकता किंवा हे पैसे तिच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता. (Utility News)
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.