Shraddha Thik
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे असे सतत सांगितले जाते.
काही लोक दिवसांतून 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याबद्दल सांगतात, तर काही लोक दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
हृदय संबंधीचे रोग असलेल्या लोकांना कमी पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. अशा वेळी हृदयरुग्णांसाठी दिवसाला किती पाणी पिणे फायदेशीर ठरेल, जाणून घेऊया.
हृदयाच्या पंपिंगचे काम पाण्याच्या सेवनाशी संबंधित असते. ज्या रूग्णांचे हृदयविकाराच्या समस्या असतात त्यांचे हृदय कमी पंप करते. त्यांना इतरांच्या तुलनेत सामान्य प्रमाणातील पाणी सेवनही पंपिंग व्यवस्थापित करण्यात अडचण येऊ शकते.
कमी पाणी पिण्याचा नियम सर्व हृदयरोग्यांना लागू होत नाही. कधी-कधी जास्त पाणी प्यायल्याने चालताना किंवा झोपताना श्वास घेण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
हृदयविकाराच्या रुग्णांनी दिवसातून दीड लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. त्याचबरोबर हृदयरोग्यांनी उन्हाळ्यात 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.
हृदयरोग्यांनी कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.