Corona Death News : कोरोनामुळं डिसेंबरमध्ये 10,000 मृत्यू; WHO प्रमुखांनी बोलता बोलता दिला 'हा' गंभीर इशारा

Covid deaths in December : कोरोनाबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. डिसेंबर महिन्यात कोरोनामुळं १० हजार मृत्यू (Covid Deaths) झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलीय.
Corona Death News
Corona Death NewsSaam Tv
Published On

WHO Reports Covid Deaths Worldwide

WHO ने डिसेंबर महिन्यातील कोरोना रूग्ण आणि मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचा अहवाल दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी सांगितलं की, मागील महिन्यातील सुट्ट्या, नागरिकांची गर्दी आणि JN.1 विषाणूचा संसर्ग या सगळ्यांमुळे कोरोनाचा प्रसार (WHO Reports Covid Deaths) वाढला आहे. डिसेंबरमध्ये सुमारे 10 हजार मृत्यूची नोंद झाली आहे, तर महिन्याभरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रूग्णांमध्ये जवळजवळ 50 देशांमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झालीय. युरोप आणि अमेरिकेत या रूग्णांचं प्रमाण जास्त असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Latest covid update)

डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी जिनिव्हा येथील मुख्यालयातून पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, महिन्याला 10 हजार मृत्यू (Corona Death) हे साथीच्या रोगापेक्षा खूपच कमी आहे. परंतु हा धोका टाळता येण्याजोग्या नाही. मृत्यूची ही पातळी खूपच जास्त आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. विषाणूमुळे निर्माण झालेल्या सततच्या धोक्यांवर त्यांनी जोर दिलाय. कोरोना डेटाचा अहवाल देत नसलेल्या प्रदेशांमध्ये वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कोरोना रूग्णांत वाढ

JN.1 हा Omicron चा प्रकार म्हणून ओळखला जातो. तो व्यापकतेने पसरत आहे. कोरोना लस या विषाणूपासून संरक्षण देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी जागतिक स्तरावर श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचं नमूद केलंय. यामध्ये कोरोना व्हायरससह फ्लू, राइनोव्हायरस आणि न्यूमोनिया यांचा समावेश आहे.

उत्तर गोलार्धात जानेवारीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, असं त्यांनी म्हटलंय. तर दक्षिण गोलार्धात सध्या उन्हाळा आहे. तेथेही कोरोना रूग्णांत (COVID) वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Corona Death News
Corona vaccine : कोरोना लशीचा डोस पुन्हा देणार का? कोण आणि का करतंय मागणी

श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ

यावर्षी विविध विषाणूंसह-संसर्गजन्य श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. डब्ल्यूएचओचे अधिकारी लोकांना लसीकरण करण्यासाठी, मास्क घालण्यासाठी आणि व्हायरसचा प्रसार (corona) कमी करण्यासाठी घरातील जागेत हवाखेळती ठेवण्याचं आवाहन करत आहेत.

WHO मधील आपत्कालीन परिस्थितीचे प्रमुख डॉ. मायकेल रायन यांनी लसींच्या परिणामकारकतेवर वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, लस कदाचित तुम्हाला संसर्ग होण्यापासून थांबवू शकत नाहीत, परंतु लसींमुळे तुमची रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची शक्यता नक्कीच कमी होते.

Corona Death News
Maharashtra Corona Udpate:चिंताजनक! राज्यात कोरोनाची दहशत कायम; JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या २०० पार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com