Corona Vaccination
Corona VaccinationSaam Tv

Corona vaccine : कोरोना लशीचा डोस पुन्हा देणार का? कोण आणि का करतंय मागणी

Corona Vaccine In European Union: पुन्हा एकदा जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. युरोपमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता, युरोपियन युनियनच्या आरोग्य मंत्रालयानं यावर चिंता व्यक्त केलीय. त्यांनी कोरोना लसीकरणाबाबत चर्चा केलीय.

Corona Patients Increase

जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस सक्रिय होताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवीन उप-प्रकार JN.1 वेगाने पसरत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियननं पुन्हा एकदा कोविड-19 साठी लसीकरणाबाबत चर्चा (Corona Vaccine ) केलीय. (latest covid update)

युरोपीय संघ आरोग्य मंत्रालयाच्या स्टेला किरियाकाइड्स म्हणाल्या की, कोरोना आणि त्याचे नवीन उपप्रकार अजूनही आपल्या सोबत आहेत. ते वेगाने पसरत आहेत. आपण एकाच वेळी तीन विषाणूंचा सामना करत आहोत, त्यासाठी लसीकरणाची आवश्यकता (Corona) आहे.

युरोपमध्ये कोरोना रूग्णांत वाढ

युरोपियन युनियनच्या देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढत आहेत. क्रोएशियामध्ये 12 ते 18 डिसेंबरपर्यंत कोविड-संबंधित 68 मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीमध्ये 2023 च्या शेवटच्या दोन आठवड्यात फ्लू आणि कोविड रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (ECDC) ने युरॅक्टिव्हला सांगितलं की SARS-CoV-2, तसंच हंगामी इन्फ्लूएंझा आणि रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) पुन्हा तयार होण्याची शक्यता नाहीये.

स्पेनच्या सरकारनं सोमवारी रुग्णालये आणि आरोग्य दवाखान्यांमध्ये लोकांना मास्क लावण्यासाठी राष्ट्रीय आदेश प्रस्तावित (Corona Vaccine) केलाय. फ्लू आणि कोरोना वाढीमुळं श्वसन रोगाच्या संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. संपूर्ण युरोपमध्ये पसरले आहे, असं इटलीनं म्हटलं आहे.

Corona Vaccination
Maharashtra Corona Udpate:चिंताजनक! राज्यात कोरोनाची दहशत कायम; JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या २०० पार

भारतात कोरोनाचे किती रुग्ण

8 जानेवारीपर्यंत देशातील 12 राज्यांमधून JN.1 या उप-प्रकारची एकूण 819 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. JN.1 उप-प्रकारची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून 250, कर्नाटकातून 199, केरळमधून 148, गोव्यातून 49, गुजरातमधून 36, आंध्र प्रदेशातून 30, राजस्थानमधून 30, तामिळनाडूमधून 26 रूग्ण समोर आली आहेत. 21 दिल्लीतील, 3 ओडिशातील आणि 1 हरियाणाचा रूग्ण आहे.

JN.1 प्रकाराच्या वाढत्या रूग्णसंख्येनंतर प्रथमच, त्रिपुरामध्ये कोरोनामुळं 1 झालाय. कर्नाटकातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनाही कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Corona Vaccination
Right To Health Law: सरकार राज्यात आणणार 'राईट टू हेल्थ' कायदा? काय म्हणाले आरोग्यमंत्री, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com