Mumbai Corona Update : मुंबईकरांची चिंता वाढली, मुंबईत वर्षभरात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद

Maharashtra Corona Update : राज्यात ६ जानेवारी रोजी कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडलीय. १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Corona Patients in Mumbai
Corona Patients in MumbaiSaam TV
Published On

Mumbai News :

मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा संख्या वाढताना दिसत आहेत. त्यात कोरोनच्या नव्या व्हेरिएंट JN.1मुळे देखील धोका वाढला आहे. त्यात मुंबईत मागील वर्षभरातील पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.  (Latest News)

मुंबईत एका ५२ वर्षीय व्यक्तीचा ५ जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. मुंबईत शेवटचा कोविड मृत्यू ९ ऑगस्ट २०२३ रोजी झाला होता. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाच दिवस ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची तक्रार होती. रुग्णालयात दाखल करण्याच्या २४ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू झाला.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Corona Patients in Mumbai
Corona Update: सावधान! दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या दीडशे पार, जेएन-१ च्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती

राज्यात ६ जानेवारी रोजी कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडलीय. १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-१ च्या रुग्णांची संख्या १३९ वर पोहोचली आहे.

त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण ९१ रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये ३० रुग्णांची नोंद झालीय. ठाण्यामध्ये ५ तर बीडमध्ये ३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ आणि नांदेडमध्ये २ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Corona Patients in Mumbai
Pune MNS News : पुण्यात मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे रुग्णसंख्ये वाढ होत असल्याने कोविड-१९ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. राज्यातही वाढती रुग्णसंख्या पाहता टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com