Corona News: कोरोना पॉझिटीव्ह असल्यास 5 दिवस गृहविलगीकरण; टास्क फोर्सचा मोठा निर्णय

5 days in home isolation in case of corona infection: प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जानेवारी रोजी पहिला कोरोना संसर्गित आढळून आला आहे. आता नव्याने ७ जण संसर्गीत आढळल्याने एकूण संख्या ८ झाली आहे.
Corona News
Corona NewsSaam TV
Published On

Coronavirus Task Force:

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केलीये. तसेच याबाब मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Corona News
Ahmednagar Corona: अहमदनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन शालेय विद्यार्थ्यांना लागण

याबाबत टास्क फोर्समार्फत लकरच नियमावली देखील जाहीर केली जाणार आहे. राज्यात सध्या ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या दहा दिवसांत ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढलीये. त्यामुळे कोरोना झाल्यास आधी गृहविलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्यात. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसेच अशा व्यक्तींना कुटुंबातील कोरोना झालेल्या व्यक्तींपासून दूर ठेवावे असे सांगण्यात आलेय.

राज्यात कोरोनासह (Corona) जेएन १ चे रुग्ण देखील वाढत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सध्या एकूण ८ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळेत. बुलढाणा जिल्ह्यात नव्याने ७ कोरोना संसर्गितांची भर पडली आहे. त्यात शेगाव येथील २ चिखली येथील २ (महिला ) तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण ४ जणांचा समावेश आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जानेवारी रोजी पहिला कोरोना संसर्गित आढळून आला आहे. आता नव्याने ७ जण संसर्गीत आढळल्याने एकूण संख्या ८ झाली आहे. शिरपूर येथील ५० वर्षीय कोरोना संसर्गीत महिलेल स्त्री रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

Corona News
Ulhasnagar crime: किरकोळ कारणावरून कामगाराचा मालकावर जीवघेणा हल्ला; उल्हासनगरमधील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com