Ahmednagar Corona
Ahmednagar CoronaSaam tv

Ahmednagar Corona: अहमदनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन शालेय विद्यार्थ्यांना लागण

Ahmednagar News : राज्यात हळूहळू पसरत असलेल्या जेएन १ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण अनेक भागात आढळून आले आहेत. या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे
Published on

सुशील थोरात 
अहमदनगर
: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने अहमदनगरमध्ये (Ahmednagar) शिरकाव केला असून शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना (Corona) कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. (Breaking Marathi News)

Ahmednagar Corona
Jalgaon Crime: वृद्धेला बोलण्यात गुंतवून हातातील सोन्याच्या बांगड्या कापून फरार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. या दरम्यान राज्यात हळूहळू पसरत असलेल्या जेएन १ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण अनेक भागात आढळून आले आहेत. (Corona Positive) या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना बाधित झाले असून दोन दिवसांपूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar Corona
Truck Drivers Rasta Roko : अपघात केल्यास १० वर्ष शिक्षेच्या कायद्याविरुद्ध चक्काजाम; मुंबई- नागपूर महामार्गावर रास्ता रोको

दोघांनाही सौम्य लक्षणे 

या दोन्ही विद्यार्थ्यांना (Student) सर्दी, खोकला असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. असे असले तरी शालेय व्यवस्थापन देखील सतर्क झाले आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com