मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात २७२८ कोविड चाचण्या झाल्या. यात १४२३ आरटीपीसीआर तर १३०५ इतक्या आरएटी चाचण्या करण्यात आल्या. आज दिवसभरात ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ४१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी १५ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात सक्रिय रुग्णांचा आकडा ८८२ झालाय. (Latest News)
आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारीपासून आजपर्यंत १४१ कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. यात ७०.९२ टक्के रुग्णांचे वय ६०च्या पुढील होते. तर ८४ टक्के रुग्णांना कोरोनासह इतर व्याधी होत्या. यातील फक्त १६ टक्के लोक हे कोरोना बाधित होते. दरम्यान कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९८.१७टक्के आहे. तर मृत्यूदर १.८१ एवढा आहे.
आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचा नवा व्हेरियटं जेएन-१चे रुग्ण २५० झाले आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात ८९१ सक्रिय रुग्ण होते. मुंबईत एका ५२ वर्षीय व्यक्तीचा ५ जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. मुंबईत शेवटचा कोविड मृत्यू ९ ऑगस्ट २०२३ रोजी झाला होता.
या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाच दिवस ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची तक्रार होती. रुग्णालयात दाखल करण्याच्या २४ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कोविड-१९ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. राज्यातही वाढती रुग्णसंख्या पाहता टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.
या जिल्ह्यात आढळले सर्वाधिक रुग्ण
मुंबई - २३- सक्रिय १६५
ठाणे मनपा - ११- सक्रिय १०४
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.