कोरोना (Corona) विषाणूच्या JN.1 व्हेरिएंटचा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात मागच्या २४ तासांत कोविडची ५२९ नवीन रुग्ण सापडले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४,०९३ इतकी नोंदवली गेली.
आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. गुजरातमध्ये JN.1 प्रकाराचे 36, कर्नाटकात 34, गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 प्रकरणे नोंदवली गेली.
या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. WHO शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सर्तकतेचा इशारा दिला आहे. या आजाराबद्दल काळजी करण्याची गरज नाही परंतु, हा आजार (Disease) ओमिक्रॉनपेक्षा ही वेगाने पसरतो आहे.
1. JN.1 व्हेरिएंटची लक्षणे (Symptoms)
ताप आणि अंगदुखी
श्वसनमार्गाचे संक्रमण
घसा खवखवणे आणि खोकला
सर्दी, नाक गळती
सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे श्वसनांच्या संबंधित अनेक रोगांची लागण झालेली पाहायला मिळत आहे. खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही सर्वात सामान्य लक्षणे सांगण्यात आले आहे.
2. JN.1 चा धोका किती?
एम्सचे डॉक्टर सौरभ मित्तल यांनी म्हटले की, या व्हायरसचा नवीन प्रकार लस घेतलेल्यांना पण होऊ शकतो. अशा वेळी घाबरुन जाऊ नका पण सर्तक राहाणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आव्हान केले आहे तसेच या आजाराबाबत कोणतेही लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगितला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.