IIT Madras Director Saam Tv
देश विदेश

IIT Madras Director: 'ताप आल्यावर गोमूत्र प्यायलो आणि बरा झालो', आयआयटी मद्रासच्या डायरेक्टरचा खळबळजनक दावा

IIT Madras Director Statement On Cow Urine: आयआयटी मद्रासचे डायरेक्टर व्ही. कामकोटी यांनी गायीच्या गोमुत्राबाबत मोठं विधान केले आहे. यावरून खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.

Priya More

गोमूत्रातील औषधी गुणधर्मांवर देशात अनेकदा वाद झाला आहे. काहींनी गोमूत्राला आरोग्यदायी असल्याचे म्हटले आहे तर कोणी या दाव्याची खिल्ली उडवली. पण आता सोशल मीडियावर आयआयटी मद्रासचे डायरेक्टर व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते गोमुत्राच्या औषधी गुणधर्मांची प्रशंसा करताना दिसत आहे. त्यांनी दावा केला की, 'एकदा मला खूप ताप आला होता. तेव्हा मी गोमूत्र प्यायलो आणि बरा झालो.' व्ही कामकोटींच्या या दाव्यानंतर आता खळबळ उडाली आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये व्ही. कामकोटी व्हिडिओमध्ये गोमूत्रातील 'अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि पाचक गुणधर्मांचे समर्थन करताना दिसत आहे. इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या आजारांसाठी याचा उपयोग होतो असा दावाही त्यांनी या व्हिडीओमध्ये केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

१५ जानेवारी २०२५ रोजी पोंगलच्या दिवशी व्ही कामकोटी हे चेन्नईतील गो-संरक्षण केंद्रात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी एक किस्सा सांगितला, जेव्हा मला खूप ताप आला होता तेव्हा मी गोमूत्राचे सेवन केले होते. कामकोटी यांनी या गोष्टी सांगितल्याच्या वृत्ताला संस्थेतील सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे. सेंद्रीय शेतकरी असल्याने गोशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्ही. कामकोटी यांच्या या वक्तव्यानंतर आता तामिळनाडूमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. डीएमके आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी कामकोटी यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. द्रमुकने कामकोटी यांच्या वक्तव्यावर टीका करत हे सत्याच्या विरोधात आणि लज्जास्पद असल्याचे सांगितले आहे. द्रमुक नेते टीकेएस एलांगोवन म्हणाले, 'केंद्र सरकारचा हेतू देशातील शिक्षण खराब करण्याचा आहे.'

तर, काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनी कामकोटी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि आयआयटी मद्राससारख्या संस्थेच्या संचालकाने अशा गोष्टीची प्रसिद्धी करणे अयोग्य असल्याचे सांगितले. डॉक्टर्स असोसिएशन फॉर सोशल इक्वॅलिटी'चे प्रमुख डॉ. जीआर रवींद्रनाथ यांनी सांगितले की, गोमूत्राच्या सेवनाने बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. केंद्रातील भाजप सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT