Mahakumbh Mela: कुंभमेळ्यात PM मोदींचा पुतण्याने गायली कबीरांची भजने, व्हिडिओ व्हायरल

PM Modi Nephew Mahakumbh Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतणे सचिन मोदी हे कुंभमेळ्यात सहभागी झालेत. कुंभमेळ्यात आल्यानंतर ते आपल्या मित्रांसोबत भजन गात असल्याचं दिसत आहे.
 Mahakumbh Mela
PM Modi Nephew Mahakumbh Mela
Published On

प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्यात साधू-संतांसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही कुंभमेळ्यात येऊन पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. या कुंभमेळ्याचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतणे सचिन मोदीदेखील आपल्या मित्रांसह कुंभमेळ्यात पोहोचलेत. त्यांनी यावेळी मित्रांसोबत संत कबीरांची भजने गायली आहेत.

भजने गात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधानांचे पुतणे असूनही सचिन मोदी महाकुंभात सामान्यांप्रमाणे वावरत आहेत. सचिन मोदीआपल्या मित्रांसह महाकुंभाच्या पवित्र वातावरणात पूर्णपणे तल्लीन झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी आपल्या मित्रांसोबत संत कबीरांची भजने गायली. सचिन मोदी हा 'श्रीराम सखा मंडळ' नावाच्या ग्रुपचा सदस्य आहेत.

हा ग्रुप दर शनिवारी अहमदाबाद आणि गांधीनगरमधील विविध ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करतो. या गटात डॉक्टर, अभियंता आणि चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. पंतप्रधानांचे पुतणे असूनही ते सामान्यांप्रमाणे वावरत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदीही दिसत आहेत.

 Mahakumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग, परिसरात धुराचे लोट; अग्निशमन दल घटनास्थळी

यावेळी महाकुंभात सहभागी होण्यासाठी गुजरातमधून भाविक मोठ्या संख्येने आलेत. त्यापैकी सचिन मोदींनी कुटुंब आणि मित्रांसह प्रयागराज गाठलं. सचिन मोदी हा 'श्रीराम सखा मंडळ' नावाच्या ग्रुपचा सदस्य आहेत. या ग्रुपचे अनेकजण कुंभमेळ्यात आले आहेत. दरम्यान कुंभमेळ्यात आलेल्या सांधूसंतांचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. अनेक सांधूच्या रुपाने ते सोशल मीडियावर चर्चेत आलेत. यातील एक बाबा म्हणजे कबूतर वाले बाबा.

 Mahakumbh Mela
MahaKumbh: मी साध्वी नाहीये, सोशल मीडियावर व्हायरल झालेली हर्षा रिछारिया असं का म्हणाली?

कबूतरांसोबत दिसणारे हे बाबा राजपुरी जी महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी मागील दहा वर्षांपासून या अनोख्या साधनेत भाग घेतला आहे, जिथे त्यांचे कबूतर त्यांच्याशी जिव्हाळ्याने जोडले गेलेत. या व्हिडिओमुळे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेत. हे कबूतर बाबच्या डोक्यावर बसते. या कबूतरचं नाव आहे, हरी पुरी. बाबांसाठी कबूतर हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com