Madras Court On Mandir: 'हा काही पिकनिक स्पॉट नाही...', मंदिरांमध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर मद्रास हायकोर्टाची टिप्पणी

Madras Court On Mandir News: हिंदूंना त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मंदिरांना पर्यटनस्थळ समजू नये. मंदिरात पूजेशिवाय दुसरे काही करणे योग्य नाही, असे टिप्पणी करत मद्रास हायकोर्टाने तमिळनाडू सरकारला सर्व हिंदू मंदिरांमध्ये विशेष फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत.
Madras Court On Mandir
Madras Court On MandirSaam Digital
Published On

Madras Court On Mandir

हिंदूंना त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मंदिरांना पर्यटनस्थळ समजू नये. मंदिरात पूजेशिवाय दुसरे काही करणे योग्य नाही, असे टिप्पणी करत मद्रास हायकोर्टाने तमिळनाडू सरकारला सर्व हिंदू मंदिरांमध्ये विशेष फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. या फलकावर 'बिगर हिंदूंना मंदिरांच्या 'कोडीमाराम' (ध्वजस्तंभ) क्षेत्राच्या आत जाण्याची परवानगी नाही" असा मजकूर लिहिण्याच्या सूचना केल्या आहेत.

डी. सेंथिल कुमार यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. श्रीमती यांनी हा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे अरुल्मिगु पलानी धनादयुतपाणी स्वामी मंदिर आणि त्याच्या उपमंदिरांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा, अशी विनंती सेंथिल कुमार यांनी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर एखाद्या बिगर हिंदूने मंदिरात एखाद्या विशिष्ट देवतेचे दर्शन घेण्याची विनंती केली तर त्याच्याकडून हमीपत्र घ्यावे लागेल की तो मंदिरात दर्शन घेत आहे. देवावर श्रद्धा आहे आणि तो हिंदू धर्माच्या चालीरीती आणि प्रथा परंपरा पाळेल आणि मंदिराच्या विधींचेही पालन करेल, तेव्हाच मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे. याशिवाय, जेव्हा जेव्हा अशा कोणत्याही व्यक्तीला हमीपत्राच्या आधारे परवानगी दिली जाते तेव्हा त्याची नोंद मंदिराच्या रजिस्टरमध्ये करणं आवश्यक आहे.

Madras Court On Mandir
Bharat Jodo Nyay Yatra: बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com