मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनं चर्चेत.
दहा दिवसांत दिल्लीपासून मुंबईपर्यंत आंदोलनं झाल्याचा दावा करण्यात आला.
या आंदोलनांमुळे राजकीय वातावरण तापल्याचे वृत्त आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात गेल्या 10 दिवसात दिल्लीपासून मुंबईपर्यंत आंदोलनाचा धडाका सुरुय. या आंदोलनांमुळे राजकीय वातावरण चांगलच तापलंय. एक नजर टाकूयात गेल्या 10 दिवसातील आंदोलनांवर.
आंदोलनांची मालिका
2 ऑक्टोबर
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत शिवाजी पार्कवर सीजेपीचं जेल भरो आंदोलन
04 ऑक्टोबर
मुंबईत मेट्रो सिनेमा ते बीएमसी मुख्यालयापर्यंत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात गर्जना मोर्चा
06 ऑक्टोबर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीचं राहुल गांधींच्या नेतृत्त्वात आंदोलन
07 ऑक्टोबर
सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधी दिल्लीच्या रस्त्यावर, पोलिसांकडून गुन्हा दाखल
08 ऑक्टोबर
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांचं राजघाटावर धरणं आंदोलन
09 ऑक्टोबर
ज्ञानेश कुमारांच्या अटकेच्या मागणीसाठी बंगळुरूतील फ्रीडम पार्कवर CJPचं आंदोलन, ध्रुव राठींची उपस्थिती
10 ऑक्टोबर
दिल्लीत जंतरमंतरवर ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी CJPचं आंदोलन, CJPच्या तिन्ही नेत्यांना थेट विमानात घुसून अटक
10 ऑक्टोबर
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर तुषार गांधींच्या नेतृत्त्वात डाव्या संघटनांचं आंदोलन
11 ऑक्टोबर
सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत CJP कार्यकर्त्यांचं आदोलन , पोलिसांकडून धरपकड सुरूच
11 ऑक्टोबर
दादर शिवाजी पार्कवर CJPच्या आंदोलनात पोलिसांच्या धरपकडीविरोधात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे रस्त्यावर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.