Traffic On Yamunotri Gangotri Expressway Saam Tv
देश विदेश

Traffic On Yamunotri Gangotri Expressway: यमुनोत्री, गंगोत्री महामार्गावर वाहतूक कोंडी; महाराष्ट्रातील भाविक १०-१३ तासांपासून अडकले

Traffic On Yamunotri Gangotri Expressway: चारधाम यात्रा सुरु झाली आहे. त्यामुळे केदारनाथ, हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी केली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यमुनोत्री गंगोत्री महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

चारधाम यात्रा सुरु झाली आहे. त्यामुळे केदारनाथ, हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी केली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यमुनोत्री गंगोत्री महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. भाविकांना जवळपास १०-१३ तास एकाच जागी अडकून राहावे लागत आहे. महाराष्ट्रातूनदेखील चारधाम यात्रेला भाविक गेले आहेत.वारजे, किरकटवाडी येथील पाच जन व कोथरूड, खराडी परिसरातील २० जणांचा ग्रुप या वाहतूक कोंडीत यमुनोत्री, गंगोत्री मार्गावर अडकला आहे.

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या चार धामचे दरवाजे आता भाविकांसाठी उघडले आहेत. त्यामुळेच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. दरम्यान, गंगोत्री आणि यमुनोत्री महामार्गाचा वाहतूक कोंडी वाढत आहे. दरवर्षी चारधाम यात्रेच्या वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.

गंगोत्री महामार्गावरील सुक्कीच्या सात वळणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. भाविक तासनतास वाहतूक कोंडीत अडकले आहे. या रस्त्यांवर गाव, हॉटेल किंवा दुकाने नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागली आहे. स्थानिक टूरिस्ट गाइड आणि स्थानिक प्रशासन यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात आहे.

गंगोत्रीला जाताना वाहतूक कोंडीत महाराष्ट्रातील माताळे आणि टेकाळे हेदेखील अडकले होते. त्यांनी माहिती दिली आहे. गंगोत्रीला जाताना आम्ही २१ तास चालत होतो. आज सोमवारी सकाळी गंगोत्री वरून उत्तरकाशीला निघालो आहे. बारा तासात आम्ही ४० किलोमीटर अंतर पार केले आहे. एक किलोमीटर गेल्यावर दोन तीन तास थांबावे लागत आहे. यामुळे सोबत घेतलेले जेवण खाद्यपदार्थ संपत आले आहे. या रस्त्यावर हॉटेल्स दुकाने गावे जवळजवळ नाही. यामुळे आलेल्या भाविक, यात्रेकरूंचे मोठे हाल होत आहेत. लहान मुले महिला असणाऱ्या यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. यमुनोत्री गर्दीमुळे फूटपाथवर अनेक ठिकाणी भाविक अडकले आहेत. त्याचबरोबर चालताना टेकडीवरून दगड पडण्याचा धोका प्रत्येक क्षणी असतो. कधी वातावरण बदलेल. काही आपत्ती, दुर्घटना घडू नये. यामुळे, भाविक पर्यटकांच्या मनात भीती आहे. मानसिक तणाव देखील येत आहे,असे राजेंद्र माताळे यांनी सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार! १६ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट, मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Bhandara : रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर; मुलीच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखलगुन्हा दाखल

Maharashtra Rain Live News: रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला; आंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली

सौरमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह कोणता?

Flood Video : पुराच्या पाण्यातून वाट काढत होता, बघता बघता वाहून गेला तरूण; थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT