ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उत्तराखंडमध्ये आज अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.
शुक्रवार दिनांक १० मेच्या सकाळी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर या यात्रेची सुरुवात झाली.-
प्रत्येक वर्षी या चारधाम यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते.
केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी ७.१० मिनिटांनी भाविकांसाठी उघडले आहेत. १०.२९ मिनिटांनी यमुनोत्री धाम तर १२.२५ वाजता गंगोत्री धामचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत.
खूप वर्षांनंतर गंगोत्री , यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे एकाच वेळी उघडले जाणार आहे.
चारधाम यात्रेनिमित्ताने संपूर्ण केदारनाथ मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
केदारनाथ मंदिर वर्षातून फक्त आणि फक्त काहीच महिने भाविकांसाठी खुले असते.