PM Modi: पंतप्रधान मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, वारासणीमधून निवडणूक लढवणार

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते सकाळी साडे अकरा नंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान मोदी
PM ModiSaam Tv

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी पीएम मोदी दाखल उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. ते सकाळी साडे अकरा नंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काल पीएम मोदींनी मोठा रोड शो करत मंदिरात पुजा केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएच्या मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं (PM Modi News) आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

वाराणसीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Varanasi Lok Sabha Constituency) सातव्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी हे सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. यासाठी ते आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीमध्ये जोरदार तयारी बाजपकडून करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी
Narendra Modi Vs Rahul Gandhi : नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना माजी न्यायमूर्तींनी दिलं एकत्र चर्चेचं निमंत्रण; चर्चेला येणार का? संपूर्ण देशांचं लक्ष

काल पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) वाराणसीमध्ये मेगा रोड शो केला आहे. सहा किलोमीटर लांबीचा रोड शो यावेळी पाहायला मिळाला. बनारस हिंदू विद्यापीठ ते काशी विश्वनाथ मंदिर असा हा रोड शो होता. यावेळी वाराणसीतील जनतेनं मोदींचं स्वागत केलं आहे. या रोड शोसाठी गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसीत दाखल झाले होते.

पंतप्रधान मोदी
Rahul Gandhi Vs Narendra Modi : राहुल गांधींनी नरेंद्र मोदींसोबत एकत्र चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं; मोदींनाही सहभागी होण्याचं केलं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com