Akot-Shegaon Highway : अकोट-शेगाव महामार्ग म्हणजे मृत्यूच्या वाटेवर प्रवास; रस्त्यावर मोठ-मोठ्या भेगा, पाहा Video

Akot-Shegaon Highway Big Cracks On road : महामार्गावर पडलेल्या या भेगा आणि खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेये. या सर्व प्रकाराबाबत स्थानिक गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकड तक्रारी केली आहेत.
Akot-Shegaon Highway
Akot-Shegaon Highway Saam TV

अक्षय गवळी

पावसाळ्यात महामार्गांच्या रस्त्यांच्या दुरावस्थेच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र आता ऐन कडक उन्हाळ्यात अकोट-शेगाव महामार्गाची दूरवस्था झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट आणि शेगाव महामार्ग नुकताच काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला. पण आज या महामार्गाची अतिशय दयनीय दूरवस्था झाली आहे.

Akot-Shegaon Highway
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

काही वर्षातच या महामार्गाला ठीकठिकाणी मोठ मोठ्या भेगा पडल्यात. महामार्गावर पडलेल्या या भेगा आणि खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेये. या सर्व प्रकाराबाबत स्थानिक गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकड तक्रारी केली आहे. मात्र त्यावर कोणतीही दखल घेतली नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

अकोट शेगाव हा अनेक शहर आणि गावांना जोडणारा महामार्ग आहे. सोबतच अकोट शेगाव महामार्गाला मध्यप्रदेशला जोडणारा महामार्ग देखील म्हणतात. आज कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेला हा महामार्ग अतिशय खराब झालाय.

या मार्गावर आपण पाहू शकता आज ठिकठिकाणी मोठ मोठ्या भेगा पडल्यात. महामार्गावरील भेगा अपघाताला आमंत्रण देत असल्याचं दिसतंय. या भेगांमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. विशेष म्हणजे याचा फटका आता वाहतुकीला बसत आहे.

Akot-Shegaon Highway
Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com