Social Media Rules : रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉस्ट लेटेंट कार्यक्रमामध्ये वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाने सडकून टीका केली आहे. यामुळे लवकरच केंद्र सरकार सोशल मीडिया इनफ्ल्युएंसरसाठी कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता आणण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. ५ ते ५० लाख फॉलोवर्स असणाऱ्या इनफ्ल्युएंसरना या कोड ऑफ कंडक्टचे पालन करावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कन्टेंटबाबत सरकारने कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. लहान मुले अश्लील आणि असभ्य कन्टेंटपासून लांब राहावेत यासाठी नियमांचा मसुदा तयार करणे, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या स्वयं-नियामक संस्थांसाठी सल्ला आणि डिजिटल इंडिया विधेयकाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरु आहे.
रणवीर अलाहबादिया प्रकरणावरुन न्यायालयाने केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. अश्लील कन्टेंटसंबंधित नियमांवरुन केंद्राला फटकारले. यामुळे सरकारने इनफ्ल्युएंसरवर कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत नियम लादू शकते असे म्हटले जात आहे. यानुसार इनफ्ल्युएंसरना त्यांच्या कन्टेंटमध्ये अश्लीलता, असभ्य वर्तन, शिव्या यांचा समावेश करु नये अशी ताकीद दिली जाणार आहे. जर त्यांनी याचे पालन केले नाही, तर त्यांना कन्टेंटवर रेटिंग देऊन स्पष्टीकरण द्यावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, कोड ऑफ कंडक्टमध्ये १ ते ५ असे रेटिंग पॉईंट्स असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत सोशल मीडिया इनफ्ल्युएंसरना त्यांच्या कन्टेंटला रेटिंग देताना डिस्क्लेमर देखील द्यावे लागणार आहे. कन्टेंटचा स्तर देखील कोड ऑफ कंडक्टद्वारे ठरवला जाईल. ५ ते ५० लाख फॉलोवर्स असणाऱ्या इनफ्ल्युएंसनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर पोलिसी कारवाई होईल.
५ लाखांपेक्षा कमी फॉलोवर्स असणाऱ्यांनी अश्लील आणि आक्षेपार्ह कन्टेंट बनवल्यास त्यांना पहिल्यांदा चेतावनी दिली जाईल. पुढे दुसऱ्यांदा दंड आणि तिसऱ्या वेळेस कायदेशीर कारवाई केली जाईल. आयटी मंत्रालयाने जानेवारीमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह कन्टेंट १८ वर्षांखालील मुलांपर्यंत पोहोचू नये यासाठी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा-२०२३ च्या नियमांचा मसूदा तयार केला होता. यानुसार लहान मुलांना सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.