Suresh Dhas : 'लोकशाही नाही तर ठोकशाहीच्या मार्गाने..' परळीत काळे झेंडे दाखवल्यावर काय म्हणाले सुरेश धस?

Suresh Dhas In Parali : मस्साजोगमध्ये सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. दरम्यान मुंडे समर्थकांनी परळीत सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत प्रदर्शने केली. या घटनेवर धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Suresh Dhas
Suresh DhasSaam Tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

आज आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते परळीतही दाखल झाले होते. परळीमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांच्या ताफ्याचा कडाडून विरोध झाला. मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवून धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुरेश धस यांनी मुंडे आणि परळीची बदनामी केली अशी भूमिका मुंडे समर्थकांनी घेतली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देत सुरेश धस यांनी आम्ही देखील आष्टीत आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू असे खुले चॅलेंज दिले आहे. परळी शहरात धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर शिरसाळा गावात देखील सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी विरोधप्रदर्शन केले. त्यावर आष्टीला आल्यानंतर त्यांना आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विरोध दर्शवू असे म्हटले.

'आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू. पण रस्त्याच्या बाजूला उभं राहून. असं गाड्यांना अडवून नाही. लोकशाही मार्गाने आम्ही काळे झेंडे दाखवू. तुम्ही लोकशाही नाही तर ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय. ही ठोकशाही टिकत नसते. निम्मी-अर्धी ठोकशाही तुरुंगात गेली तरी सुद्धा यांना कळत नाही, असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे.

Suresh Dhas
Kasara Ghat : मोठी बातमी! मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवरील कसारा घाट ६ दिवस राहणार बंद, पर्यायी मार्ग काय?

दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये गावकऱ्यांशी, ग्रामस्थांशी चर्चा झाल्याचे सांगितले. संतोष देशमुख यांच्या प्रमाणे बापू आंधळेंची हत्या करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी. आरोपींनी फाशी व्हावी. आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे धस यांनी म्हटले आहे.

Suresh Dhas
Kalyan Dombivli News : 'त्या' ६५ इमारतींच्या प्रकरणात पुन्हा गडबड! ठाकरे गटाच्या नेत्यानं केला भयंकर प्रकाराचा गौप्यस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com